Harshvardhan Sapkal : काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी देत प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. मात्र, सरकारने त्यांच्यावर कोणताही कार्यवाही केली नाही. उलट त्यांना सुरक्षा पुरवली यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
थांबू नका…’लवकरच मुले जन्माला घाला’; तामिळनाडूच्या मु्ख्यमंत्र्यांचं फर्मान, बैठकच बोलावली
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांच्या संदर्भात जो अपमान करण्यात येत आहे, त्याबद्दल उत्तर या सरकारने दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा असा यांचा कार्यक्रम आहे. नागपूरचा कोणी माणूस इतिहासकारांना शिवीगाळ करतो आणि शिविगाळ करतांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करतो, त्यांचा अपमान करतो. मात्र, सरकार त्याच्यावर कोणताही कारवाई करत नाही. उलट पोलिस त्याला सुरक्षा देतात.. कोणीतरी अभिनेता संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरतो त्यालाही संरक्षण दिले जाते. या एकूण संपूर्ण किडे प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो, असं सपकाळ म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा… रविकांत तुपकरांकडून आंदोलनाचा बॉम्ब फोडण्याचा इशारा
मुह मे राम आणि बगल मे छूरी
मुह मे राम आणि बगल मे छूरी, अशी भाजपची एकूणच कार्यपद्धती आहे. संविधानाला अभिप्रेत असलेला समाजवाद, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, वारकरी संप्रदाय, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिव-शाहू-फुले-आंबेडकर या सर्व विचारांच्या विपरीत काम करणं हे भाजपचं आणि आणि त्यांच्या मित्र पक्षांचा मूळ हेतू आहे, असा आरोप सपकाळ यांनी केली.
गोळवलकर गुरुजीं आणि सावरकरांनीही छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध अतिशय घाणेरडे आणि अश्लील लिखान केलेलं आहे. या सर्वांच्या विचाराचे पाईक म्हणून मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ काम करत आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
आश्वासनांची पूर्तता करा…
सत्तेत येत असताना केलेली आश्वासनांची पूर्तता झाली पाहिजे, सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ, हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. आता मात्र त्याचा विसर त्यांना पडला आहे. अडाणी अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले. महायुतीच्या काळात राज्यात शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.