छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मुंडके छाटा अन् त्याची माळ…; कालीचरण महाराज संतापले

Kalicharan Maharaj : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त एक ट्वीट केलं. या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला. राहुल गांधींच्या पोस्टमध्ये जयंतीनिमित्त श्रद्धांजली असा शब्द वापरला. त्यामुळे भाजपसह (BJP) महायुतीचे नेते आक्रमक झाले. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप केली. दरम्यान, आता कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला.
Delhi New CM : मोठी बातमी! रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडेक छाटा, असं कालीचरण महाराज म्हणाले.
राहुल गांधी श्रध्दांचली शब्द वापरल्याने भाजप आक्रमक झाली. राहुल गांधी महाराष्ट्रातील जनतेचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करत आहेत. जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली वाहतात.हा एक गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला. तर औरंग्याच्या पिलावळाकडून काय अपेक्षा करणार, हे हिरवे साप आहेत. राहुल गांधींनी शिवभक्तांची माफी मागावी. अन्यथा त्यांना फिरकूही देणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला.
दरम्यान, आता कालीचरण महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधींच्या ट्विटबद्दल विचारले असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणारे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडके छाटा. त्यांच्या मुंडक्यांची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला, अशा शब्दात कालीचरण महाराज यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींसारख्या मूर्ख माणसावर काय बोलायचं?, असा सवालही कालीचरण महाराजांनी केला.
भाजपकडून निव्वळ ‘ध’ चा ‘मा’, मालवण शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी मोदी कधी माफी मागणार?, कॉंग्रेसचा सवाल…
तसेच सर्व हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. छावा चित्रपट करमुक्त झाला पाहिजे, नाही झाला तरी सर्व हिंदूंनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, या चित्रपटातून मुस्लिमांनी किती अत्याचार केले हे पाहायला मिळेल, असंही कालीचररण महाराज म्हणाले.
राहुल गांधीचे नेमके ट्वीट काय?
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्याऐवजी श्रध्दांजली वाहिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन आणि विनम्र श्रध्दांजली अर्पण करतो. आपले साहस आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.