Download App

‘तेव्हा कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते…’, अजित पवार गटाची अमोल कोल्हेंवर घणाघाती टीका

  • Written By: Last Updated:

Hasan Mushrif On Amol Kolhe : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आव्हान दिलं. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करून कोल्हे यांचा पराभव करण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. त्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जुना प्रसंग सांगत कोल्हेंवर घणाघाती टीका केली आहे.

मोठी बातमी : लग्नाच्या वाढदिवशीच कुख्यात गुंड शरद मोहोळचा पुण्यात खून 

शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिरात बोलताना अमोल कोल्हे यांनी तडफदार भाषण ठोकलं. अजितदादांच्या गटात सामील न होण्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी त्यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्या भेकडांच्या गर्दीत गेलो नाही, अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटावर टीका केली. त्यांनी केलेल्यी टीकेविषयी मुश्रीम यांना विचारले असता ते म्हणाले, अमोल कोल्हे मला काही दिवसांआधी म्हणाले होते की, माझ्या व्यवसायावर परिणाम होत आहे, मी राजकारण बंद करणार आहे. आणि तेव्हाच ते भेकडासारखे पळून गेले, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीचे छापे, आव्हाड म्हणाले, ‘आपलेच घरभेदी सहकारी सामील’ 

ससूनमध्ये जिल्हा नियोजन व इतर विभागांच्या आढावा बैठकीनंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हेंवर निशाणा साधला. कोल्हे भेकडासारखे पळून गेले, पण आता त्यांना बळ आलंय, असं मुश्रीफ म्हणाले.

पक्षाने जबाबदारी दिल्यास मी लोकसभा लढवणार
या वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीबाबत मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. पण, पक्षाने जबाबदारी दिल्यास मी लोकसभा लढवणार आहे. तसेच तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून जागावाटपाबाबत निर्णय घेणार आहेत, असं मुश्रीफ म्हणाले.

यावेळी हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्याकडून रखडलेल्या गाड्यांच्या गिफ्टवरही प्रतिक्रिया दिली. तर राजाराम कारखान्याच्या मारहाण प्रकरणानंतर उफाळलेल्या महाडिक-पाटील वादावरही मुश्रीफ बोलले.

दरम्यान, मुश्रीफ यांनी कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेला आता अमोल कोल्हे काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us