मोठी बातमी : लग्नाच्या वाढदिवशीच कुख्यात गुंड शरद मोहोळचा पुण्यात खून

  • Written By: Published:
मोठी बातमी : लग्नाच्या वाढदिवशीच कुख्यात गुंड शरद मोहोळचा पुण्यात खून

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज (दि.5) दुपारी अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचार सुरु असतानाच शरद मोहोळचा (Sharad Mohol) मृत्यू झाला आहे. आज मोहळच्या लग्नाचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्याचा खून करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या होत्या.

मी फक्त ढकललं, मारहाण केली नाही; अजितदादांसमोर ‘भाई’ गिरी करणाऱ्या भाजप आमदारांची स्पष्टोक्ती

कोण आहे शरद मोहोळ?

मोहोळने येरवडा कारागृहात विवेक भालेरावच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणात जामीनही मिळाला होता. जुलै 2022 मध्ये मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपारही करण्यात आले होते. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक  गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहळला पिंटू मारणे हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणात त्याला पुन्हा अटक झाली होती.

Ajit Pawar : ‘कशाला खपल्या उकरून काढता?’ आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावर अजितदादांचं मोजकचं उत्तर

पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजप प्रवेश 

काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना त्याने राजकारणात उतरवण्याचं ठरवलं. कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाती मोहोळ यांनी भाजपात प्रवेश केला. मोहोळ यांनी राजकारणात एन्ट्री केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर मोहोळ गॅंगला राजकारणातून सपोर्ट मिळतोयं, असंही दबक्या आवाजात बोललं जात होतं. तर स्वाती मोहोळ यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून मदत मिळणार असल्याचीही शक्यता राजकीय वर्तवण्यात आली होती.

पवार आणि मुंडे यांच्यात संवाद : ढाकणे कोणता निरोप घेऊन आले होते?

भर दुपारी घडली घटना

कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात शरद मोहोळवर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला कोथरूड परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उफचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. भर दुपारी अशा प्रकारची घटना घडल्याने मोठी दहशत परसली असून, हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, आरोपींना पकडण्यासाठी टीम रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube