Disqualification Mla : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांना टाईमलाईन दिल्यानंतर आज विधीमंडळात राहुल नार्वेकरांसमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीदरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकीलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या सुनावणीला ठाकरे गटाकडून सुनील प्रभू(Sunil Prabhu), अनिल देसाई(Anil Desai) आदी उपस्थित आहेत तर शिंदे गटाच्या नेत्यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालंय.
कर्नाटाकातील ऊस पोलीस बंदोबस्तात आणण्यासाठी पोलिसांना ठेका, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
अपात्र आमदारांप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिरंगाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. या प्रकरणावर बोलताना राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. कोणाच्याही दबावाखाली ही सुनावणी पार पडणार नसल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं होतं.
Maratha Reservation : आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी काय करावं? सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडूनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना टाईमलाईन देण्यात आली होती. येत्या 31 डिसेंबरपर्यंत अपात्र आमदारांच्या प्रकरणाचा निकाल द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतरची आज पहिलीच सुनावणी पार पडत आहे.
Government Schemes : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी आत्तापर्यंत शिंदे-ठाकरे गटाकडून एकूण 34 याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांचं 6 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यानूसार याचिकांवर सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीदरम्यान, सुरुवातीला ठाकरे गटांचा युक्तिवाद त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.
याआधी 25 डिसेंबरच्या सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाच्या 4 याचिकांसदर्भात शिंदे गटाकडून देण्यात आलेल्या पुराव्यांना विरोध नाही त्यामुळे आता पुन्हा नव्याने पुरावे देण्याची गरज नसल्याचं ठाकरे गटाच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. याचदरम्यान, दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.
Shweta Tiwari : श्वेता तिवारीचा साध्या सूटमधला किलर लूक पाहिला का?
दरम्यान, एकंदरीत राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांच्या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला होती. त्यानंतर विधी मंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर ही सुनावणी पार पडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर मला मर्यादित वेळेत मुदत घ्यायची असल्याचं राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.