Cm Devendra Fadanvis : नव्या शैक्षणिक धोरणानूसार राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. या मुद्द्यावरुन विविध राजकीय संघटनांनी कडाडून विरोध दर्शवल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांनी घूमजाव घेतल्याचं पाहायला मिळालं. राज्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा असणार आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्थी सरकारने ठेवल्या असून राज्यात मराठी भाषेची सक्तीच राहणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
सातासमुद्रापार मराठीचा डंका! ‘या’ चार मराठी चित्रपटांची कान्स महोत्सवाच्या चित्रपट बाजारासाठी निवड
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेमलेल्या समितीने शिफारस केली होती की तिसरी भाषा शिकविण्यास सुरुवात होईल. यावेळी इतरभाषिक शिक्षकांची कमतरता असते. हिंदी भाषेचे शिक्षक मुबलक असल्याने हिंदी भाषेची आम्ही निवड केली होती. मात्र, आता हिंदी ऐवजी दुसरी कोणतीही भाषा निवडण्याचा पर्याय दिला जाईल असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
तिसरी भाषा शिकायची असेल आणि त्या भाषेकरीता किमान २० स्टुडन्ट असले तर वेगळा शिक्षक देता येईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. सीमावर्ती भागात अनेक भाषेचे शिक्षक असतात. तेथे द्विभाषा शिक्षक उपलब्ध असेल तर काही हरकत नाही. मात्र निवडलेल्या भाषेसाठी तर किमान २० विद्यार्थी उपलब्ध नसतील तर स्वतंत्र शिक्षक देता येणार नाही. मग तेथे ऑनलाईन पद्धतीने किंवा अन्य पद्धतीने शिकवण्याचा विचार सुरु आहे. महाराष्ट्रात मराठीची सक्ती असणारच आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भारत विकास परिषेदने नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. दिव्यांगाने जे अवयव लावली जातात त्याचा रेकॉर्ड मोडला आहे. पूर्वीच्या रेकॉर्डपेक्षा दुपटीचे काम अर्ध्या दिवसात त्यांनी करून दाखवला आहे. 800 पेक्षा जास्त दिव्यांकांना चार तासाच्या आत अवयव लावण्याचे काम करण्यात आला आहे. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड या रेकॉर्डला मान्यता दिली आहे. आता त्याच्या सर्टिफिकेट प्रदान करण्याचा सोहळा, असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय.