मुलाचं दु:ख आईला कळतं मावशीला नाही, पालकमंत्री म्हणून पंकजांचं स्वागत केलं असतं; महबूब शेख यांचा अजित पवारांवर निशाणा

Mahbub Shaikh Criticize Ajit Pawar for Beed Guardian Minister : धनंजय मुंडे यांचं नाव मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आल्यानंतर तसेच बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहता बीडच्या पालकमंत्री पदाची धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली. मात्र अद्याप देखील बीडमधील गुन्हेगारी कमी झालेली नाही. तसेच प्रशासन देखील त्याच स्थितीत आहे. अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी केली. लेट्स अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.
काय म्हणाले महबूब शेख?
पालकमंत्र्यांचं नाव बदललं पण बीडच्या प्रशासनात काहीही बदल झालेला नाही. पालकमंत्री एक दिवस तीन-चार तासांसाठी येतात तेवढ्यापुरती रस्त्याची साफसफाई होते. त्यांचे पक्षाचे कार्यक्रम घेण्यातच त्यांचा वेळ जातो. बैठक केवळ ते दोन-तीन तास बसतात. त्यामुळे बीडच्या गुन्हेगारीची परिस्थिती तशीच आहे. तसेच अजित पवार यांच्या कामाची पद्धत धडाडीची असली तरी देखील अद्याप देखील बीडमधील गुन्हेगारी कमी झालेली नाही.
… तर वाईट वाटण्याचे कारण नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
तसेच निधी आल्याने गुन्हेगारी बीडमध्ये कोणताही नवा प्रकल्प आलेला नाही. त्यामुळे ज्या त्या जिल्ह्याला त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्री असेल तर तो लोकांना भेटतो. तसेच ज्या मातीत जो जन्मला त्याची माहिती त्यांना जास्त असते. शेवटी मुलाचे दुखणे आईला जास्त कळतं मावशीला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे जरी बीडच्या पालकमंत्री झाल्या असत्या. तरी देखील त्यांचे स्वागत केलं असतं. कारण जिल्ह्यातील पालकमंत्री हा जिल्ह्यातील लोकांसाठी उपलब्ध असतो.