… तर वाईट वाटण्याचे कारण नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या एका कार्यक्रमात बोलताना याबाबतचे संकेत दिले आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच नेतेमंडळी देखील यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. कोणीही मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त मला वाटतं की, यावर माध्यमे जास्त विचार करत आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसेच त्यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठेवलेल्या ऑफरवर देखील प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑफर देणारे हे प्रतिसाद देणारे ते, मी काय बोलणार? ही बाब त्यांना विचारा. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी भांडणं, मतभेदू दूर ठेवून एकत्र यायला तयार आहे असं राज ठाकरे अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.
केंद्र सरकारची जबरदस्त योजना, मिळणार स्वस्त व्याजदरात 20 लाख; जाणून घ्या सविस्तर
तर दुसरीकडे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी जर ठाकरे बंधू एकत्र आले तर याचा सर्वात मोठा फटका महायुतीला बसू शकतो अशी देखील शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिल्लक सेना चायनीज माल, जनतेत खपणार नाही, खासदार नरेश म्हस्केंची घणाघाती टीका