चॅनलवर प्रस्ताव ठेवून युतीचे काम होत नाही; राज-उद्धव ठाकरेंच्या युतीवरून अंबादास दानवेंचा टोला

Ambadas Danave Creticize Raj Thackeray for Allince with Udhhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना युतीसाठीचा प्रस्ताव ठेवला आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनीही भूमिका मांडली आहे. त्यावर लगेचच माझ्याकडून भांडण नव्हतीच मिटून टाकली चला असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रति टाळी दिली आहे.मात्र यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
मराठी माणूस एकत्र येण्याची काहीच हरकत नाही. पण चॅनलवर प्रस्ताव ठेवून युतीचे काम होत नाही. तसेच ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा राज ठाकरे यांनी अडथळे आणले आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर संशय येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रविरोधी शक्तींशी शिवसेना लढत होती. तेव्हा राज ठाकरे यांनी आतापर्यंत कोणाला मदत केली. यांची सर्वांना माहिती आहे. मात्र दोघंही ठाकरे सक्षम आहेत. दोघे काय करायचे ते ठरवतील. शिवसेनेत पक्षप्रमुख अंतिम असतात. असं म्हणत अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एकच असून, माझ्यासोबत जाऊन हित की भाजपासोबत जाऊन हित ते ठरवा.जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं.
आता टँकरची वाट पाहावी लागणार नाही…, पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र ॲप; मंत्री विखेंची माहिती
महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा,आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
आज शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर, अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असे मांजरेकर म्हणाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा असल्याचे उत्तर राज ठाकरेंनी दिले आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद आणि अन्स सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही.
2014 आणि 2017 साली धोका मग आता विश्वास कसा ठेवायचा? मनसे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला सवाल
परंतु, विषय फक्त इच्छेचा असून, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचापण विषय नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि तो मी पाहतोच असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असे राज यांनी मुलाखतीत म्हटले आहे. मी त्यांच्याबरोबर काम करावं? ही उद्धव ठाकरेंनी इच्छा आहे का? असा प्रश्नही राज यांनी विचारला आहे.