‘500 कोटी नव्हे, प्लॅनिंग कसं केलं हा खरा प्रश्न’; जरांगेंच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा सवाल!

Raj Thackeray On Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray On Manoj Jarange Audio Clip

Raj Thackeray On Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली आणि राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप आला. त्या क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या माध्यमातून मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य करत या कथित व्यवहारापेक्षा त्यामागील नियोजन आणि पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

प्रेयसीला गर्भवती करून सोडू नका, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा तरुणांना सल्ला

‘500 कोटींचा प्रश्न नाही, प्लॅनिंग कसं केलं जातं हा मूळ प्रश्न’

राज ठाकरे म्हणाले, “क्लिपमध्ये असलेल्या 500 कोटी रुपयांचा हा प्रश्न नाही. तर कशाप्रकारे प्लॅनिंग केले जाते, तो मूळ प्रश्न आहे. या प्लॅनिंगमध्ये पत्रकारांनासुद्धा गोवलं गेलंय. म्हणजे पत्रकाराने कोणती बातमी छापायची, कोणती नाही, नाही छापली तर आम्ही काय करू, अशा प्रकारची धमकी त्या क्लिपमधून दिली आहे.”

मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. “एखाद्या माणसाला बरोबर घ्यायचे, नंतर त्याला बदनाम करायचे. त्याची माणसे फोडायची, हे चाललंय काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

500 कोटींच्या कथित व्यवहाराचा मुद्दा तापला; प्रसाद लाडांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाची फडणवीसांकडे धाव, सायबर चौकशी होणार!

‘सत्ता जाईल तेव्हा कोणत्या गोष्टी अंगाशी येतील, याचा अंदाज नाही’

या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे कोण होते, याची आपल्यालाही माहिती असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ज्या वेळी सत्ता जाईल, तेव्हा कोणकोणत्या गोष्टी अंगाशी येतील, याचा त्यांना अंदाज नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

‘ही क्लिप बाहेर आली कुठून?’ 

या संपूर्ण प्रकरणात राज ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. “तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ही क्लिप बाहेर आली कुठून?” असे ते म्हणाले.

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत ‘स्पायकॅम पेन’चा वापर? सुप्रिया सुळेंचा आरोप; कसं काम करतं डिव्हाइस?

दरम्यान, मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील दावे आणि त्यातील संभाषणाची सत्यता याबाबत अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाष्य केलं आहे. “मनोज जरांगेंनी दिलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होईल”, असे फडणवीस म्हणाले.

follow us