Download App

आशुतोष काळेंनी अमेरिकेतून सही कशी केली? शरद पवार गटाने ठेवलं बोट

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर आता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान, आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या एका आमदाराच्या पाठिंब्याच्या पत्रावर आक्षेप घेतला आहे. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे अमेरिकेत असताना त्यांनी पत्रावर सही कशी केली? असा सवाल उपस्थित करीत शरद पवार गटाकडून काळेंच्या पत्रावर बोट ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पुण्यात FTII मध्ये झळकलं वादग्रस्त बॅनर, हिंदुत्ववादी संघटना अन् विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या माणसाला आम्ही कागदोपत्रे सांभाळण्याची जबाबदारी दिली होती आता तो माणूसच गेला आहे. महाराष्ट्रासमोर त्यांच नाव घेऊन लाज काढणं योग्य नाही. राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांना शरद पवार यांनीच उभारी दिली आहे. यामध्ये हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांना शरद पवारांनीच निवडून आणलं असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Saif Ali Khan: सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, चाहत्यांकडून चिंता व्यक्त

तसेच राष्ट्रवादीत फुट पडली त्यावेळी मला शिर्डीला जाण्यासाठी मी आमदार आशुतोष काळेंच्या जवळच्या व्यक्तीला फोन केला तेव्हा समजलं की ते भारतातच नाहीत. त्यानंतर 25 तारखेला आशुतोष काळे यांचं जे पत्र आलं त्यावर आशुतोष काळेंची सही होती आणि ते पत्र निवडणूक आयोगाकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे ते भारतात नव्हतेच तर सही कशी करणार? त्याबाबतचे सर्व पुरावे आम्ही देणार आहोत. आशुतोष काळे भारतात होते की नाही? हेदेखील स्पष्ट होणार असल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे.

Manushi Chhillar: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये मानुषी छिल्लर दिसणार खिलाडीसोबत?

अजित पवार मोदींचंही ऐकत नाहीत…
राष्ट्रवादीत असतानाही अजित पवार शरद पवार यांचं ऐकत नव्हते. अजित पवार यांचा स्वभावच तसा आहे. आता ते भाजपसोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचही ते ऐकत नाहीत. अजित पवार यांना राम महत्वाचा नाहीतर ते म्हणतील तो राम असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलीयं.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेशी माझा संबंध नाही. पितांबर मास्तर त्यांनी सांगितल्यानूसार आम्ही पुढे गेलो आहोत. तुम्ही पितांबर मास्तरांच्या वयावर का बोलता? वय का काढता? आज लालकृष्ण अडवाणी 96 वर्षांचे आहेत. तुम्ही लोकांच्या वयाच्या अनुमानावरुन त्यांच्या बुद्धीचा अंदाज घेता का? असा खोचक सवालही आव्हाड यांनी केला आहे.

follow us