Assembly Election 2024 : विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ आमदार विजयी झाले होते. मात्र, पाच वर्षांत आमदारांचे पक्षांतर आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या (Assembly Election ) पराभवामुळे उद्धवसेनेसमोर जागा टिकवण्याचं आव्हान आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभांना सणांचा खो आयोगाने वाचून दाखवली संपूर्ण यादी
सर्वेक्षणावरच ठरणार मतदारसंघाचे सूत्र
मविआच्या जागावाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की, ज्यांचा आमदार सध्या आहे, त्या पक्षाला तो मतदारसंघ मिळणार आहे. मात्र, प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्र सर्वेक्षण सुरू आहे. कोणता पक्ष जिंकू शकतो, याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आज कागदावर असलेल्या मित्रपक्षांच्या मतदारसंघांत सर्वेक्षणानंतर अदलाबदल होऊ शकते.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला असला तरी उद्धवसेनेचा ६ मतदारसंघांचा दावा कायम आहे. उद्धवसेनेचा केवळ कन्नडमध्ये आमदार आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांत उद्धवसेना पिछाडीवर होती. मात्र, २०१९मधील जिंकलेल्या जागांच्या सूत्रानुसार उद्धवसेनेचा ६ विधानसभा मतदारसंघांवर दावा कायम आहे.
काँग्रेसचा ६ मतदारसंघांवर दावा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या तीन मतदारसंघांत आघाडी मिळाली होती. त्यांना सिल्लोडमध्ये २७,७५९, फुलंब्रीमध्ये २९,८५८ आणि पैठणमध्ये २७८५६ मतांची आघाडी होती. त्यामुळे काँग्रेसने या तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. त्याशिवाय कन्नड, संभाजीनगर पूर्व,संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघांची मागणी काँग्रेसने केली आहे.
जपानमध्ये मोठी घडामोड! पंतप्रधान किशिदा देणार राजीनामा; निवडणूकही लढणार नाही
राष्ट्रवादीच्या पवार गटाला हवे पैठण, वैजापूर
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्ह्यात ताकद तुलनेने कमी आहे. यापूर्वी वैजापूर, पैठण मतदारसंघांतून या पक्षाने विजय मिळवला होता. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर पक्षाचा दावा आहे.