Download App

‘मी चांगल्या भावनेने फोटो शेअर केला..,’;शरद पवारांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण…

Prafulla Patel : शरद पवार(Sharad Pawar) आमचे नेते त्यांच्याविषयी आदरच म्हणूनच मी चांगल्या भावनेने फोटो शेअर केला असल्याचं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे
नेते प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी दिलं आहे. नव्या संसदेत विशेष अधिवेशन पार पडलं. यावेळी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतचा चहापाणी घेतानाचा फोटो पटेल यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेलांबदद्ल शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पटेल यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार एकमेव चांगले नेते, अमृता फडणवीसांकडून प्रशंसा

प्रफुल्ल पटेल म्हणाले, राजकारणात आम्ही शिष्टाचार सोडून द्यायचा का? शरद पवार आमचे नेते आहेत त्यांच्याविषयी आदरच आहे, आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांच्याविषयी आदर कमी करायचा का? आमची भूमिका वेगळी आहे त्यावर कोणाचा काही आक्षेप आहे का? असे सवालही पटेल यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

“तु भेटायला ये, नाहीतर….” : मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करुन तरुणाने आमदाराच्या घरातच घेतला गळफास

तसेच शरद पवारांनी नाराजी बोलून दाखवली, अशा बातम्या चालवल्या गेल्या आहेत, मात्र ते कुठे बोलले आहेत का? मी कुठेही क्लिप ऐकली नाही, एका वृत्तवाहिनीने बातमी चालवली. वृत्तवाहिनीने बॉल टाकला आहे, यांसदर्भात अधिकृत पुरावा आहे का? मी चांगल्या भावनेने शरद पवारांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, तो दिवस संसदेचा होता नव्या वास्तूचा पहिला दिवस होता, त्यामुळे आम्ही आमच्या आदरणीय नेत्यांसोबत फोटो काढला चहापाणी घेतला, असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

Vaibhav Tatwawadi Birthday: इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वैभव तत्ववादीबद्दल काही रंजक गोष्टी…

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दोन दिवसांपूर्वी राज्यसभेतील आणि कॅफेटेरियामधील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंवर राज्यात बरीच चर्चा झाली. बंडानंतरही पवार आणि पटेल यांच्यातील गोडवा कायम असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला होता.

Maratha Reservation : शिंदे सरकारकडे 20 दिवस बाकी; मनोज जरांगेंनी सुरु केली बड्या आंदोलनाची तयारी

मात्र, आता हा फोटो ट्विटरवर का शेअर केला? असं म्हणत शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. फोटो काढल्याच्या दुसऱ्या दिवशी संसद परिसरात भेट झाल्यानंतर शरद पवारांनी याबाबत प्रफुल पटेलांना विचारणा केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी खासदारांनी दिली आहे. त्यामुळे आता पटेल यांना पवारांच्या नाराजीला सामोरं जावं लागल्याचं दिसून येत आहे.

काय होता फोटो?
विशेष अधिवेशनादरम्यान राज्यसभेत शरद पवारांसोबत फोटो काढून प्रफुल्ल पटेल यांनी तो शेअरही केला होता. शरद पवारांसोबतचा हा क्षण खास असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पटेल यांनी शरद पवारांसह इतरही खासदारांसमवेतचा फोटो शेअर केला होता. दुसरा फोटो हा राज्यसभेच्या चेंबरमधला होता, यामध्ये खासदार वंदना चव्हाण, शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी आणि प्रफुल्ल पटेल दिसत आहेत. हा फोटो संसदेतल्या कॅफेटेरियातला होता.

Tags

follow us