Download App

द्रौपदी मुर्मूंच्या आधी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर; आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Image Credit: Letsupp

Prakash Ambedkar News : द्रौपदी मुर्मूंच्या याच्याआधी मला राष्ट्रपतीपदासाठी भाजपने विचारणा केली असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला आहे. सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. अशातच वैचारिक मतभेद असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

श्रेयस तळपदे- गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’? व्हॅलेंटाईन वीकमध्ये ट्रेलर प्रदर्शित

प्रकाश आंबेडकर म्हणाले, द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्याआधी भाजपाने या पदासाठी माझ्याकडे विचारणा केली होती. तुम्ही लवकरच वयाचे ७० वर्षे पूर्ण करणार आहात. त्यामुळे तुम्हाला आता राष्ट्रपती व्हायला आवडेल का? असे मला भाजपाने विचारले होते. तर मी त्यांना माझ्याकडून अजूनही १० वर्षे शिल्लक आहेत, असे सांगितले असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.

कियारा नाही तर ‘ही’ अभिनेत्री होणार ‘भूल भुलैया 3’ची मंजुलिका; कार्तिकने थेट रिलीज डेट केली जाहीर

तसेच मला तुम्ही राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात का? २०२४ मध्ये सर्व पक्षांनी चांगली कामगिरी केली तर चित्र वेगळे असू शकते. मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या, असेही मी त्यांना म्हणालो होतो, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ९ फेब्रुवरी रोजी उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल या पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपाप्रणित एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी इंडिया अलायन्सप्रमाणे संपुष्टात येणार नाही, अशी आशा व्यक्त केली होती.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी वंचितचा आता महाविकास आघाडीचा समावेश झाला आहे. समावेश झाल्यानंतर आता जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा असल्याचं दिसून येत आहे. याआधी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील तीन्ही घटक पक्षांना 12-12 जागांचा फॉर्मूला दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. आता जागावाटपाबाबत आम्ही अंतर्गत चर्चा करुन ठरवणार असल्याचं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांकडून देण्यात येत आहे.

follow us

वेब स्टोरीज