Download App

औरंगजेबाचा हिशेब मला का मागता? मुस्लिम मुघलांशी आपले संबंध जोडत नाही; इम्तियाज जलील संतापले

Imtiaz Jaleel हे राज्यच नाही देशभरातील मुस्लिम मुघलांशी आपले संबंध जोडत नाही. असं म्हणत औरंगजेब मुद्द्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं.

Imtiaz Jaleel agressive on Aurangjeb Kabar : राज्यात सध्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याची मागणी होत आहे. त्यावरून हिंदू- मुस्लिम वाद सुरू झाला आहे. यावरूनच नागपूरमध्ये (Nagpur) वाद (Aurangzeb Tomb) चिघळला. दोन गटांमध्ये मोठी दंगल देखील झाली. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. त्यावर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारला असता ते संतापल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, औरंगजेबाचा हिशेब मला का मागता? मुस्लिम मुघलांशी आपले संबंध जोडत नाही.

आयुष्मान कार्ड असूनही उपचारांसाठी पैसे मोजावे लागतात; हेमा मालिनींचा भाजपला घरचा आहेर

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांना बोलावण्यात आले होते. यावेळी सध्या राज्यात चर्चेत असलेल्या मुद्द्यावर बोलताना जलील म्हणाले की, पत्रकार हे एक बातमी तयार करण्यासाठी नेत्यांच्या भडकाऊ प्रतिक्रिया घेताता. 7-8 प्रश्न विकास, समाज इतर मुद्द्यावर विचारल्यानंतर बरोबर 10 वा प्रश्न हा औरंगजेब मुद्द्यावर विचारण्यात येतो. तसेच प्रसारित करायच्या वेळी केवळ वादग्रस्त विषय प्रसारित केला जातो. इतर प्रश्न नाही. असा अनुभव आपल्याला एका हिंदी पत्रकाराबाबत आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

1 एप्रिलपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन योजना; ‘या’ लोकांना मिळणार 50% पेन्शन हमी

400 वर्षापुर्वी काय झालं होतं? औरंगजेब कीती क्रुर होता? त्याचा हिशेब इम्तियाज जलीलला का विचारता? मी इतिहासकार कींवा संशोधक नाही. पण मला केवळ मी मुस्लिमांचं नेतृत्व करतो. म्हणून असे प्रश्न विचारले जात आहेत. पण मी खासदार, आमदार काही एका धर्माचा नव्हतो. तसेच मी औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला तो काही औरंगजेबाचं समर्थन करण्यासाठी नाही. राज्यच नाही देशभरातील मुस्लिम मुघलांशी आपले संबंध जोडत नाही. असं म्हणत औरंगजेब मुद्द्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच यावेळी त्यांनी फडणवीसांवर देखील धर्म भेदावरून टीका केली.

follow us