आयुष्मान कार्ड असूनही उपचारांसाठी पैसे मोजावे लागतात; हेमा मालिनींचा भाजपला घरचा आहेर

Hema Malini Question on Ayushman Bharat Scheme : भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेबद्दल संसदेत प्रश्न उपस्थित केले. त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना प्रश्न विचारला आहे. (Ayushman Bharat) त्या म्हणाल्या, आयुष्मान कार्ड असूनही गरजू लोकांना त्याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. या प्रश्नाच्या उत्तरात जेपी नड्डा म्हणाले की, या योजनेचा फायदा ६३ कोटी लोकांना होत आहे, जर असे काही प्रकरण समोर आले असेल तर आपण त्यावर कारवाई करू.
हेमा मालिनी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, आयुष्मान भारतचा फायदा सुमारे ६३ कोटी लोकांना होत आहे. जर काही प्रकरण असेल तर कृपया मला स्वतंत्रपणे कळवा. परंतु, या योजनेअंतर्गत ६३ लोकांना लाभ मिळत आहे. तसंच, हा जगातील सर्वात मोठा आरोग्य कव्हरेज कार्यक्रम आहे असही ते म्हणाले.
कोणता प्रश्न विचारला?
५० कोटी लाभार्थ्यांसह, आयुष्मान भारत योजना ही आरोग्यासाठी जगातील सर्वात मोठी योजना आहे. परंतु, तरीही त्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. तक्रार अशी आहे की लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असूनही, रुग्णालय बेड उपलब्ध नसल्याचे किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णावर उपचार करण्यास नकार देते. तसंच, आयुष्मान कार्ड असूनही, गरजू लोकांना पैसे देऊन त्याच रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. आरोग्याच्या विविध क्षेत्रात सुधारणा आणि प्रगती झाली आहे का? माता आणि बाल आरोग्य, आजारांचे निर्मूलन आणि आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये देशात किती प्रगती झाली आहे असंही त्या म्हणाल्या होत्या?
जेपी नड्डा यांचं उत्तर
या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी लेखी उत्तर दिले. मंत्री म्हणाले की, आयुष्मान योजनेअंतर्गत आरोग्य सेवेत सुधारणा झाली आहे. तसेच, या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील आणि दुर्लक्षित लोकांना झाला आहे. या योजनेअंतर्गत, ०९.०९.२०२४ पर्यंत, सुमारे ५.१९ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहे.
लोकांना मदत करणाऱ्या विद्यमान उप-आरोग्य केंद्रांचे (SHC) अपग्रेड करून १,७६,५७३ आयुष्मान आरोग्य केंद्र (AAMs) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs) निर्माण करण्यात आली आहेत. तसेच, असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी, ७७० जिल्हा एनसीडी क्लिनिक, ३७२ जिल्हा डे केअर सेंटर, २३३ कार्डियाक केअर युनिट आणि ६४१० सामुदायिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तसंच, उत्तरात आई आणि बाळाच्या आरोग्याबद्दल सांगितले आहे की
माता मृत्युदर (एमएमआर) २०१४-१६ मध्ये प्रति लाख जिवंत जन्म १३० वरून २०१८-१९ मध्ये ९७ प्रति लाख जिवंत जन्मांपर्यंत कमी झाला आहे.
बालमृत्यू दर (IMR) २०१४ मध्ये प्रति १००० जिवंत जन्मांमागे ३९ होता, जो २०२० मध्ये प्रति १००० जिवंत जन्मांमागे २८ पर्यंत कमी झाला आहे.