Download App

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सतर्कता! प्रशासनाकडून बेकायदा जमावास प्रतिबंध

पुणे व शिरुर लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी ११ मे ते १३ मे पर्यंत जमावबंदी केली केली आहे.

Lok Sabha Election : पुणे आणि शिरुर लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभा (Lok Sabha Election) सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर (Pune Lok Sabha) जमाव तसंच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास पुणे शहर पोलीस (Pune Police) सहआयुक्त प्रविण पवार यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

 

धंगेकरांचं काम दाखवा अन् 5 हजार मिळवा, हेमंत रासनेंकडून मोठी घोषणा

सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर व हडपसर विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या आदेशान्वये मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या 48 तास अगोदरपासून बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

 

पोटनिवडणूक झाली नाही

2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत पुण्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात 2019 मध्ये 49.84% मतदान झाले. भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 6,32,835 मते मिळवून 3,24,628 मतांच्या फरकाने विजय मिळवला. गिरीश बापट यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला होता. त्यांना 3,08,207 मते मिळाली होती. काही दिवसांपूर्वी गिरीष बापट यांचं निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणूक झाली नाही. अता नियोजीत लोकसभा निवडणूक होत आहे.

 

मुरलीधर मोहोळाचं वाढलं बळ! गणेश मंडळ, ढोल ताशा पथकांचा जाहीर पाठिंबा

2019 ची पुणे लोकसभेची स्थिती

महाराष्ट्रातील पुणे लोकसभा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील 2024 च्या उमेदवारांच्या यादीनुसार, भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर किसन मोहोळ आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र हेमराज धंगेकर हे प्रमुख उमेदवार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट यांनी 632835 मते मिळवून विजय मिळवला होता. तर, काँग्रेसचे मोहन जोशी यांना 308207 मते मिळाली होती.

follow us