Download App

Maratha Reservation : सामाजिक आरक्षणांची मर्यादा वाढवा; काँग्रेसच्या हैद्राबाद बैठकीत ठराव

Maratha Reservation : काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीची बैठक नुकतीच हैद्राबाद येथे पार पडली. या बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

अशोक चव्हाण पुढं म्हणाले की, आरक्षणावरील 50 टक्के कमाल मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि खा. राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील घेतली होती. ऑगस्ट 2021 मध्ये 127 व्या घटनादुरुस्तीवरील चर्चेत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेचे काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी, खा. अभिषेक सिंघवी, खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, खा. विनायक राऊत, खा. सुरेश धानोरकर, खा. वंदना चव्हाण आदी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती.

नेहरू, कॅश फॉर व्होट अन्… PM मोदींनी सांगितल्या संसदेच्या इतिहासातील कडू-गोड आठवणी

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणातील अडथळा दूर करण्याची मागणी संसदेत प्रभावीपणे मांडली होती. खा. संभाजीराजे यांनी देखील मराठा आरक्षणाची मागणी करणारी भूमिका राज्यसभेत घेतली होती. आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढविण्याबाबत काँग्रेस कार्यसमितीने आता ठराव पारित करून एकप्रकारे ही पक्षाची ठाम भूमिका असल्याचे अधोरेखित केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

राजस्थानच्या राजकारणात CM शिंदेंची एन्ट्री; भाजपसाठी आव्हान की काँग्रेसची वाट बिकट होणार?

अशोक चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील इंद्रा साहनी व अन्य निवाड्यांमधून ‘केस लॉ’ झालेली 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा मराठा आरक्षणाच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे. या प्रमुख अडथळ्यावर काँग्रेसने अधिकृतपणे भूमिका घेतली असून, आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करून विशेष अधिवेशनात आरक्षण मर्यादा वाढविण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.

follow us

वेब स्टोरीज