Solapur Politics : सोलापूर लोकसभेसाठी बड्या नेत्यांचा पुढाकार, शिंदे- पाटील भेटले

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री उशीरा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंच्या सोलापुरातील ‘जनवात्सल्या’ या निवासस्थानी ही भेट झाली. जयंत पाटील यांचा शिंदे यांच्यासह कार्यकार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. पुष्पहार घालत त्यांचा हा सत्कार झाला. त्यानंतर जयंत पाटील लगेचच तेथून बाहेर पडल्याचं दिसून आलं. यावेळी गेल्या कांही दिवसांपासून सोलापुरातील […]

Untitled Design   2023 02 10T115837.797

Untitled Design 2023 02 10T115837.797

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री उशीरा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंच्या सोलापुरातील ‘जनवात्सल्या’ या निवासस्थानी ही भेट झाली. जयंत पाटील यांचा शिंदे यांच्यासह कार्यकार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. पुष्पहार घालत त्यांचा हा सत्कार झाला. त्यानंतर जयंत पाटील लगेचच तेथून बाहेर पडल्याचं दिसून आलं.

यावेळी गेल्या कांही दिवसांपासून सोलापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सोलापूर लोकसभेच्या जागेवरून शाब्दिक चकमक सुरू आहे. या काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मनजुळवनी करण्यासाठी आता थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे या दोन बड्या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा : Thane राष्ट्रवादीला मोठा धक्का! 5 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश

त्याचबरोबर यावेळी राज्यातील महाविकास आघाडीतील महत्वाच्या बाबीवर ही चर्चा झाली असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ? या भेटीमागे काय कारणं होती ? हे विचारलं असता त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे.

Exit mobile version