Thane राष्ट्रवादीला मोठा धक्का! 5 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश
आगामी ठाणे (Thane) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर काही पक्षातील नेते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. ठाण्यामध्ये या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. स्वतः हणमंत जगदाळे यांनीच याबद्दल भूमिका मांडली आहे.
हेही वाचा : Cow Hug Day : मिठी मारल्याने महाघोटाळ्याचे पाप धुतले जाणार का ? ‘सामना’ तून मोदी सरकारवर हल्लाबोल
जगदाळे यांनी एका निवदेनात म्हटलं आहे की, “गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाचे नेतृत्व करीत असताना आपण मला कायम साथ दिली. मी जे पुढील पाऊल उचलणार आहे, लोकमान्य, शास्त्री, सहकार नगर या विभागाचा क्लस्टर योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करून घेण्यास मी कटिबद्ध आहे.”
“रविवारी (12 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता कोरस हॉस्पिटल रोड लक्ष्मी पार्क जवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे”
हेही वाचा : Kasba – Chinchwad पोटनिवडणुकांसाठी गृहमंत्री Amit Shah उतरले मैदानात
नरेश म्हस्के यांच सूचक वक्तव्य
काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी येत्या 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे 12 वाजवणार असं म्हणत सूचक विधान केलं होतं. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली होती.
एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक यांच्यात वाढत्या जवळकीमुळेच 12 ते 15 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं होतं. दरम्यान, 5 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून, आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे.