Download App

शाई फेकीचा राज्य सरकारला धसका, शाई पेनावर प्रतिबंध

नागपूर : शाई फेकीचा सरकार आणि भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. शाई फेकीपासून वाचण्यासाठी आता विधानभवन परिसरात तसेच भाजपच्या कार्यक्रमांत शाई पेन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिल्ड वापरण्यास सुरुवात केली आहे. आता त्यापुढे आता शाई पेनवर देखील बंधन आणली जात आहे.

विधान भवन परिसरात पहिल्या दिवशी प्रवेश करताना अनेकांना एका वेगळ्याच प्रसंगाला समोर जावं लागलं. विधान भवनात प्रवेश करताना गेटवर असलेल्या मेटल डिटेक्टरवर जीवाला घातक वस्तू तपासल्या जातात. त्याच बरोबर पोलिसांकडून सिगारेट, तंबाखू, लायटर आदी वस्तू तपासल्या जातात. त्यात आणखी एक भर पडली आहे. आज विधिमंडळ परिसरात जाताना प्रत्येक व्यक्तीच्या खिशाला लागलेले पेन तपासले जात होते. हे पेन शाईचे आहेत का? याची विचारपूस करून तपासले जात होते. या तपासणीमध्ये पत्रकारांची देखील सुटका झाली नाही. आम्ही पत्रकार आहोत, आमचं आयडी कार्ड आहे हे सांगूनही शाईंपेन विधान भवन परिसरात आणू दिले गेले नाहीत.

ही परिस्थिती विधान भावना पुरती मर्यादित होती असे नाही. नागपूरमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्याच्या बैठकीत देखील शाई पेन तपासण्यात आल्याचं समोर आलं होतं.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक झाल्यानंतर ६ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलीस देखील धास्तावले आहेत. बंदोबस्तात चूक राहू नये म्हणून पोलीस देखील कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीत.

तर दुसरीकडे झालेल्या शाई फेकीमुळे ज्या पद्धतीने नामुष्कीचा समोर जावं लागलं. त्याचा धसका भाजपच्या नेत्यांनी देखील घेतली आहे. एकूणच या शाई फेकीनंतर पोलीस प्रशासन ताक देखील फुंकून पित असल्याची प्रतिक्रिया उमटली.

Tags

follow us