Supriya Sule On Chhagan Bhujbal : बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून जन सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवरून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधीपक्षाचे नेते येणार होते. पण बारामतीमधून फोन गेला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, असा आरोप भुजबळ यांनी केलाय. या आरोपाला आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच छगन भुजबळ यांना एक चॅंलेजही दिले आहे. (Is there any proof that the phone went from Baramati? Supriya Sule reply to Bhujbal)
जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करा अन् अरबी समुद्रात…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
बारामतीतून फोन गेला याचा पुरावा आहे का भुजबळांकडे ? असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, सीडीआर काढून बघू ना, कुणी कुणाला फोन केला. त्या बैठकीबाबत आम्ही प्रस्ताव मागितला होता. त्यासाठी मी स्वतः बोलले होते. आता त्यांनी आमंत्रण कुणाला दिले हे मला माहिती नाही. मी दहा वर्षांपासून आरक्षणावर संसदेत बोलत आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटकांच्या आरक्षणावर मी बोलत आहे. प्रस्ताव मागत आहे. यांच्या आधी मी हा विषय उपस्थित केला आहे. तोडगा काढण्यासाठी लोकसभेत बिल आणले पाहिजे. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह इतर राज्यात आरक्षणाचा प्रश्न आहे, असे सुळे म्हणाल्या.
हौसे-नवशे-गवश्यांना भुलू नका माझा वादा पक्का असतो; अजितदादांचं भर पावसात बारामतीकरांना आवाहन
छगन भुजबळांचा आरोप काय?
मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला मी, जितेंद्र आव्हाड यांना बोलविले होते. त्यांना मी कायद्याचे काही कॉपी दिल्या. त्यांना सांगितले की काही झाले तरी शरद पवार यांना बैठकीला बोलवून घ्या. व्ही. पी. सिंग यांनी दिलेले आरक्षण हे शरद पवारांनी लागू केले म्हणून आम्ही त्यांचा जय जयकार केला. त्यांचे आभारही मानले. आरक्षणासारखे प्रश्न जेव्हा निर्माण होतात. तेव्हा जेष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी तिथे यायला पाहिजे होते. असे सांगितले जाते सर्व येणार होते. पण पाच वाजता बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि बैठकीला येणारे विरोधीपक्षांच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजित पवार यांच्यावर असेल. तुमचा राग छगन भुजबळांवर असेल. पण ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे. का तुम्ही येत नाही ? का हे सगळे मिटविण्यासाठी, तुम्ही आमच्याबरोबर येत नाही. सगळ्यांना सांगायचे आहे. मग पाठीमागून काही तरी सल्ले द्यायचे, त्यातून महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग चालविले जात आहे, असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.