Download App

धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, उद्धव ठाकरेंच ओपन जीपमधून बाळासाहेबांच्या शैलीत भाषण

  • Written By: Last Updated:

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. तर आज ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. तर या निर्णयाविरोधात ठाकरेगटाने लढाई तर आता सुरू झाली आहे असे म्हणत रणशिंग फुंकले आहे.

निवडणूक आयोगाचा निकालानंतर आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, तेच आमचे पक्ष प्रमुख आहेत, ही भावना घेऊन आज राज्यभरातून आलेले शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर एकवटले. याच शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे लढाईसाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे.

पुढील रणनीती काय हे ठरवण्यासाठी त्यांनी आज ओपन जीपवर भाषण केलं. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली. १९६८ साली बाळासाहेबांना दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जीपच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी याच पावलावर पाउलं ठेवत मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू असे म्हणत शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही. निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या हातात काही नाही पण लढाई आता सुरु झाली असल्याचे ते म्हणाले.

Kangana Ranuat : स्त्रिचा अपमान करणारा नीच माणूस वाचू शकत नाही

ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने सुरू आहे. त्याच पध्दतीने मशालही काढतील. माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते, असं थेट आव्हान देत धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो असे ठाकरे म्हणाले.

रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभा राहील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

ठाकरे म्हणाले, आज महाशिवरात्र आहे. उद्या शिवजयंती आहे, जणू काही या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं आहे, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे. पण ज्यांनी हे चोरलं त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे.

आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेला मधाचा आस्वाद घेतला आहे पण त्यांना अद्याप मधमाशांचा डंख लागलेला नाही. तो डंख आता करायची वेळ आलेली आहे, असं त्यांनी सांगितले.

 

 

 

Tags

follow us