Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजप (BJP) पक्षात जाण्यास इच्छुक आहेत. पण त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रखल्याने त्यांनी भाजपला थेट इशारा दिला. आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लवकर घेतला नाही तर आपण राष्ट्रवादीतच काम करु, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खडसेंवर जोरदार टीका केली. खडसे हे जनतेच्या विकासाचे राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण करत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली. त्या टीकेला आता खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
प्रेक्षकांचा होणार भरपूर मनोरंजन, 28 नोव्हेंबरला भेटीला येणार ‘बॅक टू स्कूल’
चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आला आणि त्यांना टांग मारून परत म्हणतो, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आता म्हणतो मी शिंदे साहेबांचा… किती वेळा नवरे बदलले तू आणि कुणाला बोलतो?, असा पलटवार खडसेंनी केला.
एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले, चंद्रकांत पाटलांमध्ये नीतीमत्ता आहे का? तुझी नियत आहे का? चंद्रकांत पाटील हा आधी शिवसेनेचा अध्यक्ष होता. निवडणुकीमध्ये तो अपक्ष लढला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आला आणि त्यांना टांग मारून परत म्हणतो, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे, आता म्हणतोय मी शिंदे साहेबांचा आहे. नेमका तू कोणाचा आहे? किती वेळा तून नवरे बदलले तू आणि कुणाला बोलतो?, असा सवाल खडसेंनी केला.
जबरदस्त! ‘या’ सरकारी योजनेत एकदाच गुंतवा पैसे अन् दरमहा करा कमाई
सरड्यासारखा रंग कोण बदलत आहे? तू बदलतोय का मी बदलतोय? मी तर अजून कुठल्याचं पक्षात गेलेलो नाही, असा पलटवार खडसेंनी केला.
चंद्रकांत पाटील यांची टीका काय?
मतदार राजाचं काही झालं तरी चालेल, पण माझ्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे, सुनबाईला खासदार केलं, मंत्री केलं. आता मुलगी आमदार झाली पाहिजे, यासाठी खडसे राष्ट्रवादीत तांबले. अन्य पक्षात गेल्यापेक्षा राष्ट्रवादीत थांबून त्यांना मुलीला मदत करायची आहे. ते धुर्त राजकीय खेळी खेळत आहेत. खडसे जनतेच्या विकासाचे राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण करत आहेत. खडसे हे रंग बदलणारे सपरटणारे प्राणी आहेत, अशी टीका पाटील यांनी केली होती.