Raosaheb Danve on Assembly Election : आपल जर केंद्रात सरकार आलं तर आपल्याला लगेच गरम गरम तव्यावर विधानसभेच्या निवडणुकीची पोळी भाजून घ्यावी लागेल असं वक्तव्य जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. (Jalna Lok Sabha) दानवे जालन्यात त्यांच्यासाठी आयोजीत केलेल्या प्रचार सभेत बोलत होते.
मनोज जरांगेंचे यांचे गणित लोकसभेला सुटणार : रावसाहेब दानवे अडचणीत
खोतकरांसोबत राहणार
सध्या शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर माझ्यासोबत आहेत. तसंच, विधानसभेला आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत असं वचनही दानवे यांनी यावेळी खोतकर यांना दिलं आहे. यावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना दानवे यांनी आपण खोतकर यांनी विधानसभेला साथ देणार आहोत असा विश्वास दिला.
खोतकरांशी चर्चा
लोकसभा निडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर नाराज असल्याची मोठी चर्चा होती. त्यामुळे ही लोकसभेला दानवे यांना डोकेदुखी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली होती. त्या दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा केली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष लोप पावतील…; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
मराठा आंदोलनाचा प्रभाव
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात लढत होत आहे. तर, मराठा आरक्षणासाठी स्वत:ची चारचाकी जाळणारे आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडी फोडाफोडी करणारे मंगेश साबळे अपक्ष निवणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच, मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव जालना जिल्ह्यात जास्त जानवतो.