Download App

युक्रेन-रशिया युद्ध रोखलं, मग विनेशबाबत जे घडलं तेही रोखायला हवं; जयंत पाटलांचा मोदींवर निशाणा

विनेश फोगट यांचा परफॉर्मन्स गत काही दिवसांपासून खूप चांगला होता. पण अचानक असं काय झालं की त्यांचे वजन 50 ते 100 ग्रॅमने वाढले? - पाटील

  • Written By: Last Updated:

Jayant Patil attack on PM Modi : कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) यांचे वजन अवघं काही ग्रॅम जास्त ठरल्याने त्यांना ऑलिम्पिकमधून अपात्र ठरण्यात आलं. त्यांचा आजचा सामना सुवर्णपदकासाठी होणार होता. पण त्यांचं वजन 100 ग्रॅम जास्त भरल्याने त्या अपात्र ठरल्या. दरम्यान, विनेश यांच्या अपात्रतेमागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. शिवाय पाटील यांनी या अपात्रतेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

BB Marathi : कॅप्टन अंकिता आणि घनःश्याममध्ये बाचाबाची; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुढे काय घडणार? 

विनेश फोगट यांचा परफॉर्मन्स गत काही दिवसांपासून खूप चांगला होता. पण अचानक असं काय झालं की त्यांचे वजन 50 ते 100 ग्रॅमने वाढले? असा सवाल पाटील यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्यं केलं. विनेश फोगट यांच्या अपात्रतेविषयी विचारले असता पाटील म्हणाले की, विनेश फोगट यांचा परफॉर्मन्स गेले काही दिवस खूप चांगला होता.मग अचानक असं काय झालं की, त्यांचे वजन 50-100 ग्रॅम वाढले. जर त्या जिंकून आल्या असत्या तर त्यांना काही दिवसांपूर्वी जी वागणूक मिळाली होती, त्यांनी जे आंदोलन केलं होतं, ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल, असं कोणाला वाटलं का? यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा विचार केला पहिजे, असं पाटील म्हणाले.

Bigg Boss Marathi : नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले; कोण होणार नॉमिनेट? 

सत्ताधाऱ्यांकडून मोदी है तो मुमकिन है चा नारा दिला जातो. त्यांनी युक्रेन-रशिया युद्ध रोखल्याचाही दावा केला जातो. मग त्यांनी विनेश यांच्याबाबत जे घडलं, तेही रोखण्याची गरज होती, असं म्हणत पाटील यांनी मोदी सरकारला मिश्किल टोला हाणला.

शिंदे सरकारचा निवडणुका पुढं ढकल्याचा प्रयत्न…
यावेळी बोलतांना पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले आहे. त्यामुळेच त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका एक महिना पुढं म्हणजे नोव्हेंबरमध्ये ढकलण्याची बुद्धी सूचत आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. सरकार 15 नोव्हेंबरनंतर विधानसभा निवडणुका घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. योजनांचे पैसे लोकांना देण्यासाठी ते असा प्रयत्न करत आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

follow us