Download App

Jayant Patil : मुख्यमंत्रिपद जाणार म्हणून शिंदेंचं कुणी ऐकत नाही; जयंत पाटलांनी सांगितली ‘अंदर की बात’

Jayant Patil : अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून लवकरच मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे. त्यांची केव्हाही गच्छंती होऊ शकते. अशा वावड्या उठवल्या जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर असतात. अजितदादा लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं भाकित त्यांनी केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अत्यंत मिश्किल शब्दांत उत्तर दिलं आहे.

जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना संजय राऊत यांच्या या वक्तव्याबद्दल विचारलं. त्यावर जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदेंना संध्याकाळी व्यवस्थित झोप लागू द्या. तुम्ही का त्यांना त्रास देताय. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आता त्यांच्यानंतर कोण मुख्यमंत्री अशी चर्चा केली तर आता प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. हे कधी जाणार म्हणून आयएएस, आयपीएस अधिकारी सुद्धा त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. सगळं सरकारच ठप्प होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत त्यांच्याबाबत अशा वावड्या उठवणं योग्य नाही. कोण कोण मुख्यमंत्री होणार याची यादी बरीच मोठी आहे.

Devendra Fadnavis : अजितदादा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, आमच्या शुभेच्छा पण..

यावेळी प्रकाश सोळंखेंच्या मुद्यावर तसेच अन्य करण्यात आलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) गौप्यस्फोटांबाबत आपण योग्य वेळ आली की बोलणार असल्याचे जयंत पाटलांनी यावेळी सांगितले. बऱ्याच गोष्टींची कामात केलेल्या कृत्यानंतर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते. त्यामुळे अजितदादांनी जे काम केले, कृती केली त्यासाठी अधून-मधून ते भाषण करून स्पष्टीकरण देतात. आम्ही ते ऐकतो फक्त या सर्वांवर आपण योग्य वेळी आली की सर्व सांगेल असे ते म्हणाले.

..तर अजितदादांनी सोळंकेंना मंत्री केलं असतं 

भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर ज्यावेळी अजित पवार गटातील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यावेळी अजितदादांना सोळंखेंची नाराजी दूर करण्याची संधी आली होती. अजितदादांना सोळंखेंबाबत खरचं जिव्हाळा असता तर, त्यांनी सोळंखेंना मंत्री केलं असतं, परंतु तसे झाले नाही. प्रकाश सोळंखे आमच्याकडे आले तर, आम्ही त्यांचं गणित बसवूच, पण ते येतील की नाही याबाबत आतातरी सांगणं कठीण आहे.

Jayant Patil : ‘मोदीजी, फित कापून खुशाल श्रेय घ्या!’ ‘निळवंडे’ची आठवण सांगत जयंत पाटलांचा टोला

Tags

follow us