Download App

अजितदादांची CM होण्याची इच्छा, जयंत पाटील म्हणाले, ‘पाच वर्ष तरी शक्य नाही…’

ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण, आता पाच वर्ष दुसरे कोणी मुख्यमंत्री होणं शक्य नाही. - जयंत पाटील

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्रिपादाची इच्छा लपून राहिलेली नाही. काल पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याची इच्छा व्यक्त केली. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, एक दिवस तो योग येईल, अशा शब्दात अजितदादांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर आता शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटी (Jayant Patil) यांनी भाष्य केलं. आता पाच वर्षे अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणे शक्य नसल्याचं ते म्हणाले.

पाकिस्तानला हादरवणारी बातमी! ‘या’ शहरातील इमारतींवर बलूच बंडखोरांचा कब्जा; काय घडलं? 

जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेविषयी विचारलं असता ते म्हणाले, ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण, आता पाच वर्ष दुसरे कोणी मुख्यमंत्री होणं शक्य नाही. पण, तरीही अजित पवार मुख्यमंत्री झालेच तर आम्हाला आनंद आहे, असं पाटील म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.

अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते विविध बैठका आणि कार्यक्रमांसाठी एकत्र आल्याचं दिसलं. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जोर धरत आहे. यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. रयत एज्युकेशन सोसायटीची एक बैठक झाली होती. या बैठकीसाठी पवार साहेब आणि अजित पवार एकत्र आले. पण, या बैठकीचा राजकीय अर्थ काढण्यात तथ्य नाही. आणि घरात एखादा कार्यक्रम झाला असेल तो घरगुती कार्यक्रम आहे, घरगुती कार्यक्रमात एकत्र येण्याची आपली परंपरा आहे, असं सांगत त्यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढू नये, असंच पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.

धीरूभाईंनी बाळासाहेबांना मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं होतं माझं नावं…, गणेश नाईकांचा गौप्यस्फोट 

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते
महाराष्ट्र महोत्सव-२०२५ मध्ये ken (दि. 2 मे) महाराष्ट्रातील कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते, आज महिलांचा गौरव करत आहोत हे सांगतानाच महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात यश मिळविले आहे. आम्ही पण अनेक महिलांना संधी देण्याचे काम करत आहोत. लाडक्या बहिणीसाठी चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते, पण ते अद्याप शक्य झालेले नाही… कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटत आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, एक दिवस तो योग येईल, असं ते म्हणाले.

 

follow us