Download App

जयंत पाटलांनी पप्पु शिंदेचं नाव घेताच फडणवीस चिडले; म्हणाले, ‘बीड घटनेला राजकीय..,’

Devendra Fadnvis Vs Jayant Patil : तुम्ही पप्पु शिंदेचच नाव का घेताहेत, माझ्याकडे जाळपोळ घटनेतील इतर अनेक आरोपींचे नेत्यांसोबतचे फोटो आहेत, याला राजकीय वळण देऊ नका, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी जयंत पाटलांच्या प्रश्नावर दिलं आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात बीडच्या जाळपोळ प्रकरणाशी पप्पु शिंदेचं नाव घेत त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत ते स्पष्ट करा, असा सवाल जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. त्यावरुन आता फडणवीस-पाटील यांच्यात रणकंदन सुरु झाल्याचं पाहायला मिळालंय.

‘लोकप्रतिनिधींवर आरोप असतील तर त्यांची चौकशी व्हावी’, मढी देवस्थान मारहाण प्रकरणी ढाकणेंची मागणी

काय म्हणाले होते जयंत पाटील?
बीडमध्ये घडवण्यात आलेल्या जाळपोळच्या घटनेत अनेक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणा पप्पु शिंदे नामक आरोपी असल्याचं म्हणत पप्पु शिंदे हा एका राजकीय नेत्याचा भाचा आहे. त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत, त्याच्या माध्यमातून बीडमध्ये गॅंग चालवली जात आहे. याबद्दल आम्हाला माहित आहे, पण सभागृहात सत्ताधाऱ्यांनी त्याचे कोणाची लागेबांधे आहेत? हे स्पष्ट करावेत, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

दाऊदच्या हस्तकासोबत ठाकरेंचा शिलेदार; राणेंचे आरोप अन् फडणवीसांनी घोषित केली SIT


फडणवीस काय म्हणाले?

तुम्ही पप्पु शिंदेंसोबतचंच का विचारलं? त्यामध्ये सुरज शिंगडे, चुराळे, नवनाथ शिराळ हे कोण आहेत? यांचे फोटो माझ्याकडे आहेत. त्यामध्ये कुठला आरोपी कोणासोबत आहे, हे दिसत आहे. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण देऊ नका, हा राजकीय विषय नाही. जाळपोळीचं काम ज्याने केलंयं त्याच्यावर कारवाई आम्ही करु. मग तो कुठलाही आरोपी असो त्याला सोडणार नाही म्हणजे नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी काय सुनावलं?
जाळपोळ घटनेतील आंदोलक एका ठिकाणी 5 हजार तर दुसऱ्या ठिकाणी दीड हजारांचा मॉब होता. त्यामुळे अशा परिस्थितीत घटनास्थळी पोलिस परिस्थिती पाहुन निर्णय घेत असतात. त्यामुळे पोलिसांनी नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा हवेत गोळीबार केलेला नाही. आंतरवली सराटीत पोलिसांनी जे काही केलं त्यावरुन विरोधकांनी टीका-टीप्पण्या केल्याचं पाहायला मिळालं होतं. मी एसआयटी संदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा केली असून जर सभागृहाची इच्छा असेल तर दोन दिवसांत बीडच्या जाळपोळ प्रकरणी एसआयटीची स्थापना करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बीड जाळपोळ घटनेनंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं गेलं. राष्ट्रवादी भाजप शिवसेनेच्या नेत्यांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी कारवाई केली नसते तर घटना गंभीर झाली असते. या प्रकारामध्ये 278 आरोपी अटक करण्यात आली आहेत. त्यातील 30 आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. तसेच माजलगाव केसमध्ये 40 गुन्हेगार फरार असून बीडच्या केसमध्ये 61 गुन्हेगार अद्याप सापडलेले नाहीत. त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. आरोपींच्या अटकेनंतर हा प्रकार प्लॅन होता का? याचीही चौकशी केली जाणार आहे. मास्टमाईंडच्या दिशेनेही तपास सुरु असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us