Download App

Jitendra Awhad ; एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीची अंत्ययात्रा काढली

Jitendra Awhad on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही यात्रा निघत आहेत. इथून पुढे सगळ्या यात्रा निघतील पण सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीची अंत्ययात्रा काढण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. राजकारणातील आदर, आपलेपणा संपवून वैमानस्य निर्माण केले आहे. कोणाला जेलमध्ये टाकले, कोणावर खोट्या केस टाकल्या आहेत. असे राजकारण ह्या महाराष्ट्राने कधी पाहिले नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर केला आहे.

नागपूर शहरात (Nagpur Rally) आज महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभा होत आहे. त्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. भाजप आणि आरएसएसच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची सभा आहे.

शिंदे जाणार … अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत?

यावेळी आपल्या भाषणात आव्हाड म्हणाले की, मुघलांच्या आडून मोदी सरकारने महात्मा गांधींचा इतिहास NCRT च्या अभ्यासातून काढून टाकला. गांधी देशाला कळू नये म्हणून हे कारस्थान केल जात आहे. ते वारंवार गांधींना मारायचा प्रयत्न करत आहेत पण गांधी कधी मरत नाही. गांधी विचाराने जिवंत आहेत आणि आम्ही गांधींच्या विचाराने चालत आहेत, असे आव्हाड म्हणाले.

जगभरातून कोणत्याही देशाचा प्रमुख आला तरी त्यांना महात्मा गांधी यांना नतमस्तक व्हावे लागते. हा देश गांधींचा आहे पण काय दिवस आले. कुठला बाबा येतो आणि म्हणतो नथुराम की जय म्हणा.. नथुराम होता म्हणून देश घडला. हे असे वाचले, ऐकले की डोळ्यातून आश्रु वाहू लागतात. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणतेही योगदान नव्हते अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र गेला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Tags

follow us