Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामधील झालेला संवाद सांगत अजित पवारांवर आपल्याला कोरोना झाल्याने आपलं पालकमंत्री पद काढून घेतल्याचा गंभीर आरोप केला. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये आज (3 जानेवारीपासून) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा दोन दिवसीय मेळावा सुरू झाला आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंचा किस्सा सांगत अजित पवारांवर परखड टीका केली.
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरीच्या साडीतील ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा
जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार हे पालकमंत्री पदाबाबत ठरवत होते. मला त्यांनी पालकमंत्री पद दिलेच नाही. त्यावेळी मला मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः भेटून सांगितलं होतं की, जितेंद्र आम्हाला रायगड हवं होतं. आम्ही तुम्हाला पालघर द्यायला तयार होतो. तसेच मी खास तुझ्यासाठी पालघर सोडलं होतं.
धक्कादायक! म्हशी अन् रेड्याच्या चरबीपासून तूप; भिवंडीतील कारखाना उद्धवस्त
पण अजित पवारांना आदिती तटकरेंसाठी रायगड हवं होता. त्याचबरोबर मला कोरोना झाल्यानंतर अजित पवारांनी दोन तासातच माझं पालकमंत्री पद काढून घेतलं. त्यावर माझा एवढाच प्रश्न आहे. मी ज्येष्ठ मंत्री नाही का? पक्षाचा कार्यकर्ता नाही का? मला कोरोना झाला. म्हणून पालकमंत्री पद काढण्यात आलं. मात्र कोरोना झालेल्या किती जणांना तुम्ही अशा प्रकारे काढलं? मी पक्षात सावत्र होतो का? आणि कोरोना झाला. म्हणजे मी बरा झाल्यावर पुन्हा पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारू शकलो असतो. कोरोना झाला. म्हणजे मी मेलो नाही ना. असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला.
दरम्यान याच शिबिरामध्ये बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडण्याचा विडा काही जणांनी उचललाय पण, डरने की जरुरत नहीं संपूर्ण पक्ष कोल्हेंच्या पाठिशी उभा आहे, असा इशारा जयंत पाटील यांनी अजित पवार यांना दिला.