Download App

‘अंदर की बात है, जितेंद्र आव्हाड अजितदादा के साथ है…’; सुधीर मुनगंटीवारांचा दावा

  • Written By: Last Updated:

Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात श्रीरामांविषयी (Shriram) केलेल्या वक्तव्यामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’ असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. संत महात्म्यांनीही आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपल्या खुमासदार शैलीत आव्हाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

लोकसभेसाठी तुमचं नाव चर्चेत? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘दिल्लीत थंडी खूप, माझ्याकडे स्वेटर…’ 

आज माध्यमांशी बोलतांना मुनगंटीवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात विचारले. त्यावर बोलतांना ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांची भाषा घसरत चालली आहे. त्यामुळं त्यावर अधिक काय बोलायचं? पण, त्यांच्या अशा बोलण्याने अंदर की बात है, आव्हाड अजितदादा के साथ है, हे मात्र सिध्द होतं. शरद पवारांसोबत राहून अशी वक्तव्य करून ते त्यांच्या गटात जे काही चार दोन लोक राहिले आहे, त्यांनाही संपवण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. हा रामभक्तांचा देश आहे. बरं झालं आव्हाड अजून बाथरुमपर्यंत आलेले नाहीत, अशी टोलाही त्यांनी लगावला.

T20 World Cup 2024 : वेळापत्रक जाहीर; 9 जूनला भारत-पाकिस्तान ‘या’ ठिकाणी भिडणार ! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला अयोध्येत निर्माणाधीन राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. त्यासाठी देशभरातून हजारो लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपचे किती आमदार जाणार? असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारला असात ते म्हणाले, 22 जानेवारीला एकही आमदार अयोध्येला जाणार नाही. 25 जानेवारीनंतर अयोध्येला जाता येणार आहे, हा देश रामभक्तांचा आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेळ मिळताच अयोध्येला जाणार आहे. त्यावर आताच कधी जाणार याची चर्चा करण्यात अर्थ नाही, असं ते म्हणाले.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, 25 जानेवारीनंतर कोणत्याही जिल्ह्यातून भाविकांना मागणी केल्यास विशेष रेल्वे उपल्ध करून दिली जाईल. पण, त्यासाठी आगाऊ पैसे द्यावे लागतील.

पुरावे हाती लागल्यावर कारवाई
आज शऱद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने छापेमारी केली. विशेष म्हणजे रोहित पवार परदेशात असताना ईडीने छापे टाकले. त्याविषयी विचारले असता मुनगंटीवार म्हणाले की, ईडी त्यांची कारवाई करते, त्यात पक्षाचा विषय नसतो. सुनील केदारांवर कारवाई झाली तेव्हा त्यात पक्षाचा हात नव्हता. जर ईडीला काही माहिती उपल्बध झाली तर ते सत्यता तपासतात. सत्यतेत तथ्यच असली तर कारवाई करते. पुरावे हाती लागल्यावर ईडी कारवाई करते, असं मुनगंटीवार म्हणाले.

follow us