संजय शिरसाटांचे मंत्रिपद धोक्यात? ‘त्या’ भेटीनंतर भाजपसह एकनाथ शिंदेही नाराज
Eknath Shinde On Sanjay Shirsat : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता राज्यातील मंत्रिमंडळात
Eknath Shinde On Sanjay Shirsat : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता राज्यातील मंत्रिमंडळात देखील बदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे संजय शिरसाट यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची माहिती समोर येत आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करणारे काँक्रोज पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याने संजय शिरसाट यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याचा दावा मीडिया अहवालात करण्यात येत आहे. संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याने महायुती (Mahayuti) सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. भाजपने याबाबात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आपली भूमिका स्पष्ट केली असून या भेटीमुळे एकनाथ देखील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज
तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरुन संजय शिरसाट यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या धोरणाविरुद्ध जाऊन ही भेट घेतल्याने अनेक जण संजय शिरसाट यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तर या भेटीवर बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील कारवाईची मागणी केली आहे. अशा नेत्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
धर्मेंद प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी तसेच शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी देखील अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे दोन्ही नेत्यांवर काय कारवाई करणार याबाबत सध्या तर्कवितर्क लावण्यात येत आहे.