Download App

अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, दाखला देत आव्हाडांचा आरोप

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : अजित पवार (Ajit Pawar) गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिले आहे. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात (supreme court) आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने अजित पवार गटाला आगामी निवडणुकीत घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र, या जाहिरातीवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

Loksabha उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीवर नतमस्तक पाहा फोटो 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचं म्हटलं.

शरद पवार गटाने निवडणुक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अजित पवार गटाला आगामी निवडणुकीत घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्यास परवानगी दिली. तर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला त्यांच्या चिन्हाखाली एक टिप्पणी लिहायला सांगितली आहे.

कोर्ट काय म्हणालं होतं?
अजित पवार गटाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये नोटीस जारी करावी आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातीमध्ये असं नमुद करावं की, त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं ‘घड्याळ’ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षनाव याबाबचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असं आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, आता अजित पवार गटाकडून प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात देण्यात आली असून, त्यावरून आव्हाड यांनी ट्विट करत आरोप केले. आव्हाड यांनी ट्वीट करत लिहिलं की, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रसारीत केलेल्या जाहिरातींमधील शब्दांचा सर्वोच्च न्यायालयाच्या टीप्पणीचा कुठेही शाब्दिक संदर्भ दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या बाबी न्यायालयाने नमूद केल्या नव्हत्या; त्या बाबी जाहिरातीमध्ये नमूद करून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून अवमानच केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचाही सन्मान करण्यात येत नसेल तर याला सत्तेची मग्रुरी नाही तर काय म्हणायचे?, असा सवाल त्यांनी केला.

रोहित पवार काय म्हणाले?

या जाहिरातीबाबत रोहित पवार यांनीही अजित पवार यांच्या पक्षावरही टीका केली आहे. जाहिरात पोस्ट करत त्यांनी लिहिलं की, या निवदेनातील पहिले वाक्य खरे असले तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण, अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढं वापरता येईल, अन्य़था घड्याळ तर जाईलच पण वेळ अशी येईल की, याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय.

follow us