Download App

शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही; हे रंग बदलणारे सरडे; भुजबळांच्या टीकेवर आव्हाडांचा घणाघात

Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोन दिवसांपूर्वी बोलतांना थेट शरद पवारांवर टीकेची झोड उठवली होती. आम्ही राष्ट्रवादी सोडल्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल. पण, धनंजय मुडेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनाही वाईट वाटलंच असेल, असं म्हणत पवारांनीच मुंडे घराण्यातील फुटीचं खापर शरद पवारांवर फोडलं. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घेलता. शरद पवारांनी कधी गोपीनाथ मुंडेंच्या घरातही डोकाऊन बघितलं नाही, मुंडे घराणं पवारांनी फोडलं नाही, हे रंग बदलणारे सरडे आहेत, असा शाब्दीक हल्ला आव्हाडांनी केला. (Jitendra Awhad on Chhagan Bhujbal Sharad Pawar did not break the house of Gopinath Mude)

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. त्यानंतर अजित पवारांनी पक्षावरच दावा ठोकला. त्यामुळं राज्यातील वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान, राष्ट्रवादीत फुट फडल्यानंतर आज पहिल्यांदा शरद पवारांनी येवल्यात सभा घेतली. या सभेत आमदार जितेंद्र आव्हाड बोलत होते. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडेंच्या घरात शरद पवारांनी कधी डोकावूनही बघितलं नव्हतं. पंडितआण्णा मुंडे जेव्हा शरद पवारांकडे आले आणि आम्हाला राष्ट्रवादीत घ्या, असं म्हणाले. त्यावेळी शरद पवारांनी त्यांना नकार दिला. एकदा-दोनदा नव्हे, तर तीनदा शरद पवारांनी पंडित मुडेंना नकार कळवला होता, असं आव्हाड म्हणाले.

Bharat Jadhav: “हे शहर आता…,” भरत जाधवने थेटच सांगितले मुंबई सोडण्यामागचं खरं कारण… 

केवळ नकारच दिला नाही, तर समजावून सांगितलं की, गोपीनाथराव आणि तुम्ही एक व्हा. तुम्ही समजासाठी एक झालं पाहिजे. नेतृत्व तुम्हाला चांगल मिळालं. त्या नेतृत्वाला धक्का लावयाची माझी इच्छा नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडेंना फोन करूनही याची कल्पना दिली. घरात फुट पडतेय, घर सांभाळा असं ते गोपीनाथ मुडेंना म्हणाले होते. उगाच बदनामी करू नका. शरद पवार हा घरं फोडणार नाही, तर घरं जोडणारा, माणसं जोडणार नेता आहे, हे महाराष्ट्र जाणतो, असं आव्हाड म्हणाले.

ते म्हणाले, राष्ट्रवादी सोडून गेलेले आज काहीही बोलतात. हे रंग बदलणारे सरडे आहेत. एकीकडे वार करायचं, अन् त्यालाच बाप म्हणायचं, ही यांची नीती आहे. तुम्ही शरद पवारांना विठ्ठल म्हणू नका, बाप म्हणू नका, दैवतही म्हणू नका. कारण, बापावर घाव घालणं हे महाराष्ट्रच्या रक्तात नाही, अशी टीका त्यांनी केली.

सर्वसामान्यांचा, शोषित, दलित, कामगारांचा, शेतकऱ्यांचा नेता एकच आहे तो म्हणजे, शरद पवार. हा माणूस जात, पात, धर्म-पंथ काही जाणत नाही, जाणतो ती फक्त महाराष्ट्राची माती. त्यामुळं आगामी निवडणुकांत शरद पवार ज्याला शेंदूर लावलीतल, त्याला देव करून टाका, असं आवाहनी आव्हाडांनी केलंय.

Tags

follow us