Download App

‘भारतात बसून चांद्रयान चंद्रावर उतरु शकतं, मग ईव्हीएम मार्फत मतदान…’; आव्हाडांना शंका

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad on EVM : येत्या वर्षात तेलंगणासह 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत, तसेच 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, ईव्हीएम मशीनवर विरोधकांनी कायम आक्षेप घेतला आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनशी छेडछाड करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. कारण नुकतंचं तेलंगणाचे भाजप नेते आणि खासदार डी. अरविंद (D. Arvind) यांनी कोणतंही बटन दाबा, मोदीचं जिंकतील असा दावा केला. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपवर टीका केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=a8rzAjZAcCI

देशातील निवडणूक प्रक्रियेत भाजपकडून कशाप्रकारे सेटींग लावली जाते याची धक्कादायक कबुलीच भाजप खासदार डी. अरविंद यांनी दिली आहे. ते म्हणाले, ईव्हीएमवर नोटा, कार, हात यापैकी कोणतेही बटन दाबा, मत भाजलाच जाणार आणि मोदीच जिंकणार असं विधान अरविंद यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळं मोदीच जिंकणार याची पोलखोल झाली. त्यामुळं विरोधी पक्षांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी ट्विट करत लिहिलं की, भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे, हे बटनांवर ठरवलं गेले आणि त्यात यशस्वी देखील झाले. मग ईव्हीएम मार्फत मतदान कोणाला करायचे हे ठरवणे काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर ईव्हीएम मशीन भाजपला मतदान करू शकतं. विषय फार सोपा आहे. समजून घेता आलं पाहिजे, असं ट्विट आव्हाड यांनी केलं.

देशातील विरोधी पक्ष अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित करत आहेत. आता जितेंद्र आव्हाड यांनी चांद्रयान-३ मिशनचा हवाला देत ईव्हीएम मशीनवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भारतात बसून चांद्रयान चंद्रावर उतरु शकतं, मग ईव्हीएम मार्फत मतदान कोणाला करायचं हे ठरवणं काय अवघड आहे? आव्हाडांच्या या दाव्यामुळं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय महिला अंध क्रिकेट टीमने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाला हरवून सुवर्णपदकावर कोरले नाव 

23 ऑगस्ट रोजी भारत ‘स्पेस पॉवर’ म्हणून उदयास आला आहे. देशाच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेतील लँडर विक्रम चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि भारताने इतिहास रचला. या यशस्वी लँडिंगमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. चंद्रावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंगनंतर, भारताचे हे यश जागतिक मीडियाने देखील उचलून धरले. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी चांद्रयानच्या लँडिंगचे थेट कव्हरेज केले.

Tags

follow us