Download App

सरकार किती खोटं बोलणार? आव्हाडांकडून भिडेंच्या सुरक्षेचा पुरावाचा सादर

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad on sambhaji bhide : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे सातत्याने महापुरूषांवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जातोय. भिडेंच्या विधानावरून पावसाळी अधिवेशनात गदारोळ झाला. राज्य सरकारने भिडेंची सुरक्षा व्यवस्था मागे घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, सरकारने भिडेंना सुरक्षा नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता भिडेंच्या सुरक्षेचा पुरावाचा जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) शेअर केला. (Jitendra Awhad on shinde fadanvis pawar goverment over sambhai bhide security)

जितेंद्र आव्हाडांनी भिडेंच्या सुरक्षेचे काही व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केले. त्यात आव्हाड यांनी लिहिलं की, सरकार म्हणतंय, मनोहर भिडेला सुरक्षा नाही. खालील व्हिडीओ बघा. हे पुरावे आहेत. गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह मनोहर भिडे अकोला आणि अमरावती येथे फिरत होते. सरकार किती खोटं बोलणार? असा थेट सवाल आव्हाडांनी केला.

महात्मा गांधींचे वडील हे करमचंद गांधी नसून मुस्लिम जमीनदार होते, असं विधान भिडेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निदर्शने केली. आता भिडेंची सुरक्षा व्यवस्था मागे घ्यावी, अशी मागणी होऊ लागली. अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संभाजी भिडेंना देण्यात आलेल्या सुरक्षेबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. मनोहर कुलकर्णी यांना पोलिस संरक्षण मिळाले आहे. त्यांना सुरक्षा असेल तर ती सुरक्षा काढून घेणार का? महापुरुषांचा अवमान करून स्वत: संरक्षणात राहायचं, हे योग्य नाही, आपण त्यावर काय निर्णय घेणार? असा सवाल जयंत पाटलांनी गृहमंत्री फडणवीस यांना विचारला.

नितीन देसाईंची आत्महत्या : फायनान्स कंपन्यांची पठाणी वसुली ऐरणीवर; बड्या बँकरचा महत्वाचा सल्ला 

त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडेंना अशी कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. जयंत पाटील यांची माहिती चुकीची आहे. फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून थेट पुरावे सादर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये संभाजी भिडे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत फिरताना दिसत आहेत. त्यामुळं सरकार आता भिडेंची सुरक्षा काढून घेणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us