Download App

नारळ कुणावर तरी फोडावं लागतं म्हणून…; अजित पवारांच्या टीकेला आव्हाडांच प्रत्युत्तर

Jitendra Awhad : नारळ कुणावर तरी फोडावं लागतं. माझा कुठला साखर कारखाना नाही की, माझं काही बॅकग्राऊंड नाही. माझ्यामागे कुणीच नाही. मी नेहमी म्हणतो माझ्या मागे फक्त एकच ताकत आहे, ती म्हणजे, शरद पवार. हे कुठंतरी खटकत असावं. कारण, एवढं सगळं होऊनही मी बोलताच राहतो, त्यामुळं मला टार्गेट केलं जातं, असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (ajit pawar) टीका केली. (Jitendra Awhad react on ajit pawar over sharad pawar retirement)

आज जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीमध्ये जी फुट पडली, त्याविषयी तुम्हाला जबाबदार का धरलं जातं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच आव्हाड म्हणाले, नारळ कुणावर तरी फोडावं लागतं. माझा कुठला साखर कारखाना नाही. मी कुठल्या बॅंकेचा चेअरमन नाही, कुठला दुध महासंघ नाही. माझी काही औद्योगिक नगरी नाही. माझ्यामागे कुणीच नाही. माझ्यामागे काही प्रॉपर्टी नाही. पैसाअडका नाही नाही. माय-बाप नाही. मी नेहमी म्हणतो माझ्या मागे फक्त एकच ताकत आहे, ती म्हणजे, शरद पवार. हे कुठंतरी खटकत असावं. कारण, एवढ सगळं होऊनही हा बोलताच राहतो, असं वाटत असावं. त्यामुळं मला टार्गेट केलं जातं, कुणावर तरी बोट दाखवणं, सोपं असतं. पण पुरावा देणं महाकठीण असतं. तुमचा दरारा, दहशत सगळ्यांना ठऊक आहे, अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवारांचा समाचार घेतला.

मुश्रीफांना मंत्रिपद दिल्याने समरजित घाटगेंची मोठी कोंडी; उद्या भूमिका स्पष्ट करणार 

राष्ट्रवादीतील बडानंतर आज अजित पवारांनी पक्षाची बैठक घेतली. या बैठकीत बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांसह जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. आव्हाडांचं नाव न घेता अजित पवारांनी तो ठाण्याचा पठ्ठ्या म्हणत आव्हाडांवर प्रहार केला. ठाण्याच्या पठ्ठ्यामुळं गणेश नाईक आपल्याला सोडून गेले. संदीप नाईक सोडून गेले. वसंत डावखरे म्हणायचे, साहेब ह्याला का मोठं करतात, असं म्हणत अजित पवारांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला. याला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं.

नारळ कुणावर तरी फोडावं लागतं, म्हणून माझ्यावर टीका होते. माझ्यामुळं पक्षाचे नेते पक्ष सोडून गेले, असं वाटत असेल तर ठीक आहे. तुम्ही माझ्याविषयी काहीही बोलू शकता. माझी काहीही तक्रार नाही. पण, शरद पवारांवर जे काही बोलला आहात, त्याच्याविरोधात मी उभा आहे. साहेबांना बाय बाय, घऱी जा, असं सांगणं ही कुठली माणूसकी आहे? असा सवाल करत मी कुठल्याही प्रकारची माणसं जवळ ठेवली, हे आज पवार साहेबांना कळलं, की, हे माझाच घास घ्यायला निघालेत. हे अमानवीय आहे. अजित पवारांना शरद पवारच नकोसे झाले होते. ज्यांच्याकडे वय नाही, त्यांना हाकलण्यासाठी एवढा आटापिटा…. ज्या आईने खायला वाढलं, त्या आईच्या हातून भांडचं ओढून घ्यायचं, अशी यांची प्रवृत्ती असल्याचं आव्हाड म्हणाले.

Tags

follow us