Kamal Vyavahare Independent Candidate From Kasba : यंदा विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) कसब्यात देखील बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालंय. कसबा (Kasba) मतदारसंघात कमल व्यवहारे या अपक्ष उमेदवार आहेत. त्या कॉंग्रेस पक्षामध्ये होत्या. कॉंग्रेसमधून राजीनामा देवून अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली आहे. किटली ही त्यांची निशाणी आहे. सध्या त्या प्रचारात व्यस्त आहेत. दत्तवाडी या परिसरात त्या प्रचाराच्या निमित्ताने होत्या. यावेळी कमल व्यवहारे यांनी (Kamal Vyavahare) लेट्सअप मराठीच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधलाय. यावेळी कमलताई व्यवहारे म्हणाल्या की, मी 28 तारखेला अर्ज भरला. मला 4 तारखेला चिन्ह मिळालं. 5 तारखेपासून मी तयारी गेली. गेल्या 7 दिवसांपासून तयारी करून आजपासून मी पदयात्रा सुरू केली आहे. कसब्याच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी निघाले आहे, असं कमल व्यवहारे म्हणाल्या आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मला सगळ्या नेत्यांचे फोन आले. मी कोणाचं नाव घेवू इच्छित नाही, एके काळी ते माझे वरिष्ठ नेते होते. त्यामुळे मी कोणाला अडचणीत आणणार नाही. मी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी माझा फोन बंद ठेवला होता. कारण मी अगोदरच ठरवलं होतं की, कोणत्याही परिस्थितीत मला माघार घ्यायची नाही. आपल्याला लढायचं आहे. कसब्याच्या जनतेच्या विश्वासावर मी माझं हे धाडसी पाऊल उचललेलं आहे. माझी सर्व प्रतिष्ठा, सर्व आयुष्य, कॉंग्रेस पक्षातील सर्व करिअर पणाला लावून मी हा निर्णय घेतलेला आहे, अशी प्रतिक्रिया कमल व्यवहारे यांनी दिलीय.
महायुती की महाविकास आघाडी?, कोण येणार सत्तेत? ‘IANS’ च्या सर्वेक्षणाने थेट आकडेवारीच मांडली
पाच वेळा नगरसेवक म्हणून कमला व्यवहारे निवडून आल्या आहेत. पुण्यातील पहिल्या महिला महापौर म्हणून त्या राहिल्या आहेत. यंदा कसब्यात देखील सांगली पॅटर्न चालणार, असं कार्यकर्ते म्हणत आहेत. यावेळी कमलताई म्हणाल्या की, मला कोणाला किती हलक्यात ठरवायचं ते ठरवू द्या, 23 तारखेला कसब्यातील जनता ठरवेल. कमलताई व्यवहारे यांनी कसब्याचा इतिहास बदलणार, असं ठणकावून सांगितलं आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जनता इतिहास बदलणार. आम्ही परिवर्तन घडवणार, असं सांगितलं आहे.
झारखंडच्या ‘या’ ३२ मतदारसंघांत महिलाच किंगमेकर; भाजपसाठी वाटचाल आव्हानात्मक
कमलाताईंना किती मतं पडणार, असं म्हणणाऱ्यांनी 23 तारखेला लीड मोजावं. आम्हीच विजयाचा गुलाल उधळणार, असं कार्यकर्ते म्हणाले आहेत. कमलताईंवर अन्याय झालाय. दोन ते तीन वेळेस त्यांचं तिकीट डावललं गेलंय. पक्षाने इथून मागे कामगिरी नाही बघितली, त्यांना पक्षाने तिकीट दिलं असतं तर आम्हाला आनंद झालाय. आता आम्ही मतदार दाखवून देवू की, त्या भरघोस मतांनी निवडून येतील. अपक्ष निवडणूक लढवून मला, मी परिवर्तन घडवू शकते हे सिद्ध करायचं आहे. मला कुणाला ताकद दाखवायची नाही, मी केवळ कसब्यातील जनतेच्या ताकदीवर उभी आहे, असं कमल व्यवहारे यांनी ठणकावून सांगितलं आहे.