Kasba Peth Bypoll Election : इच्छुकांची मांदियाळी ‘… काँग्रेस कोणाला देणार संधी?
पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवणुकीसाठी (Kasba Peth Bypoll Election) पुणे शहर जिल्हा काँग्रेसची (Congrss) इच्छुक उमेदवारांची (Candidate List) यादी जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी पाहता ही संख्या तब्बल १६ वर पोहोचली आहे. यामध्ये काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dhabekar), कमल व्यवहारे (Kamal Vyavahare) अशा मोठ्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. माञ, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यासाठी आणखी काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.
कसबा पेठ पोटनिडणुकीसाठी काँग्रेसकडून तब्बल १६ उमेदवार इच्छुक असून त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डींग लावली आहे. मात्र, काँग्रेस प्रदेश कमिटी नक्की कोणाला तिकिट देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे अंतिम उमेदवार कोण असेल याची घोषणा लवकरच करणार आहे.
काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उमदवारांची नावे पुढीप्रमाणे : अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, नीता राजपूत, संगीता तिवारी, विजय तिकोणे, आरीफ कांचवाला, संजय सुरेश कांबळे, भोलेनाथ वांजळे, योगेश भोकरे, ऋषिकेश विरकर, गौरव विजय बाळंदे, अस्लम अब्दुल रज्जाक, शिवाजीराव आढाव आणि गोपाळ तिवारी असे एकूण १६ जणांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केला आहे.