Kapil Sibal on ajit pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत (NCP) बंड केलं. त्यानंतर अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेचा वाटेकरी झाला. या बंडानंतर अजित पवारांनी पक्षावर आणि पक्षचिन्हावरच दावा ठोकला. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव किंवा घड्याळ म्हणून पक्षाचे चिन्ह यापैकी काहीच मिळणार नसल्याचा दावा कॉंग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केला. (Kapil Sibal On ajit pawar and Uddhav Thackeray they said Ajit Pawar wont get NCP)
https://www.youtube.com/watch?v=T_PO8NAs7kE&t=958s
शिवसेनेतील बंडाळीनंतर एका वर्षाने राष्ट्रवादीतही फुट पडली. त्यामुळं राज्याच्या राजकारणता एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे पक्ष चिन्ह देण्यात आलं. यानंतर राष्ट्रवादीतील घटनाक्रमही त्याचं मार्गीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एका इंग्रजी न्यूज पोर्टलशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना सिब्बल म्हणाले की, विधानसभा आणि संसदेतील सदस्यसंख्येच्या आधारावरून पक्ष कुणाचा आहे, हे ठरवले जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देतांना सांगितलं होतं. याासाठी कोर्टाने संघटनेतील बहुमताचा विचार करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह परत मिळू शकते. तसंच अजित पवार यांना आमदार संख्येच्या आधारावरून राष्ट्रवादीचे नाव किंवा पक्षाचे चिन्ह मिळणार नाही, असे सिब्बल म्हणाले.
Sanjay Raut : ‘अजितदादांच्या बंडानंतर आता राऊत CM शिंदेंच्या संपर्कात’
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह दिले आहे. पण, उद्धव ठाकरे यांच्या गटाने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.
आता अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर आणि निवडणूक चिन्हावर दावा केला असून यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाने याविरोधात कॅव्हेट दाखल केले आहे. लवकरच सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. अशाच कपिल सिब्बल यांनी अजित पवार गटाला काहीच मिळणार नसल्याचं सांगितलं.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडली होती. त्यामुळे सिब्बल यांनी केलेल्या या दाव्यात तथ्य असल्याचं मानलं जातं. सिब्बल यांच्या या दाव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.