Sanjay Raut : ‘अजितदादांच्या बंडानंतर आता राऊत CM शिंदेंच्या संपर्कात’

Sanjay Raut : ‘अजितदादांच्या बंडानंतर आता राऊत CM शिंदेंच्या संपर्कात’

Sanjay Raut : राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे घडलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही बसू लागले आहेत. राष्ट्र्रवादीनंतर आता उद्धव ठाकरे गटाला विधानपरिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह ठाकरे गटाचे दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत (शिंदे गट) गेल्याने आणखी एक धक्का बसला आहे. फुटीने आधीच जर्जर झालेल्या शिवसेनेसाठी (उबाठा) परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यानंतर आता थेट संजय राऊत देखील मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. ( Sanjay Raut contact with CM Shinde after Ajit Pawar enter in power )

Rakhi Sawant:’आता कसं बनवू टोमॅटोचा सॅलेड…’; वाढलेल्या दरावर राखी भडकली! 

संजय राऊत यांच्यामुळे जी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाच्या विचारावर सुरु झाली होती. त्याविचारांशी केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे केली तडजोड केली. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये संजय राऊत सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत होते. तसेच ते संजय राऊत सत्तेचे सुत्रधार बनण्यासाठी प्रयत्न करत होते.वेगवेगळ्या सोर्सेस मार्फत त्यांचे प्रयत्न सुरू होते.

छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांचा झंझावत, राज्यव्यापी दौऱ्याची तारीख ठरली

त्यानंतर आता अजित पवार सत्तेत आल्याने संजय राऊत हताश होवून वैफल्यग्रस्त झालेले आहेत. सत्तेत येण्याकरता संजय राऊत प्रयत्न करत होते आता ते होवू न शकल्याने ते हताश झाले आहेत. त्यांना नैराश्य आले आहे. यामुळे संजय राऊत आता मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. असा गौप्यस्फोट शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता ठाकरे गटालाही गळती लागलीय. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरेंना जय महारष्ट्र केला होता. तर एकनाथ शिदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनीही साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निलम गोऱ्हे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गट सोडण्याचं कारण सुषमा अंधारे असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाताच सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube