Atul Bhosale Campaign For Assembly Election 2024 : महायुती (Mahayuti) सरकारने आपल्या भागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे आपल्याला भाजपा महायुतीच्या सरकारच्या पाठीशी उभा राहायचं आहे. येत्या काळातही येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोली आणि या परिसरात असणाऱ्या सर्व गावांच्या आणि वाड्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही भाजपा – महायुतीचे कराड दक्षिण मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांनी केले. येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, वीरवाडी व म्हासोली याठिकाणी आयोजित प्रचार बैठकीत ते (Assembly Election 2024) बोलत होते.
यावेळी सवादेचे माजी सरपंच संजय शेवाळे, पंकज पाटील, येवतीचे माजी सरपंच सागर शेवाळे, दिनकर पाटील, आण्णासो शेवाळे, पंजाबराव चोरगे, भास्कर शेवाळे, अण्णा पाटील, अनिल वीर, पोपट शेवाळे, शेळकेवाडीच्या सरपंच सुनंदा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोठी बातमी! महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा
डॉ. अतुलबाबा भोसले पुढे म्हणाले की, निवडणुकीत आता प्रचाराला कमी अवधी राहिलाय. आपण भाजपा महायुतीच्या सरकारने केलेल्या योजनांची आणि विकासकामांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. विद्यमान आमदार गेल्या दहा वर्षातील कामे पुन्हा या निवडणुकीत सांगत आहेत. त्यांनी एकालाही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. भूकंप संशोधन केंद्र उभारले हे आता ते किती वर्षे सांगणार आहेत? ज्यावेळी उभारले त्यावेळी लोकांनी दिली की मते! अजून जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसणार आहात? निवडून आल्यावर त्यांचा या गावांशी अन् इथल्या लोकांशी संपर्क नाही, अशी टीका डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली. कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून, मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
प्रारंभी येवती येथे येवती, शेवाळेवाडी, घराळवाडी, दुधडेवाडी, काटेकरवाडी, काजारवाडी, हणमंतवाडी या गावांची बैठक घेण्यात आली. यावेळी येवती येथे संजय शेवाळे, सागर शेवाळे, पाटीलवाडी येथे सुभाष पाटील, वीरवाडी येथे परशुराम वीर, म्हासोली येथे दिनकर पाटील, सुनंदा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.
शंकर जगतापांना लाखाच्या ‘लीड’ने आमदार बनवा, मोरेश्वर भोंडवेंची जगतापांना साथ…
यावेळी येवतीचे माजी सरपंच सागर शेवाळे, महादेव शेवाळे, जगन्नाथ शेवाळे, मारुती शेवाळे, दादासो शेवाळे, शिवाजी शेवाळे, मारूती देसाई, बाजीराव देसाई, संजय बोरगांवकर, मुंकु़द शेवाळे, रत्नापा कुंभार, पोपट शेवाळे, सुरेश मोहिते, जगन्नाथ घराळ, विलास शेवाळे, प्रदिप सोनवणे, सचिन जाधव, नितीन मोरे, राजेंद्र सोरटे, रमेश लोखंडे उपस्थित होते. येवती येथे संदीप शेवाळे, गणेश शेवाळे, महेश शेवाळे, काशीनाथ सोरटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पाटीलवाडी येथे प्रकाश पाटील, उत्तम पाटील, भानुदास पाटील, जगन्नाथ पाटील, अंकुश पाटील, शिवाजी पाटील, शंकर साठे, सिद्रम पाटील, महादेव शेवाळे, अभय पाटील, शंकर वीर, नितीन हिनुकले, विजय बाबर, माजी सरपंच सुभाष पाटील, प्रकाश पाटील, हणमंत पाटील, सुनिल पाटील, उत्तम पाटील, अनिल पाटील, बाळासो पाटील, मधुकर पाटील, महादेव शेवाळे, मोहन पाटील, बबन पाटील, डॉ. संजय पाटील, भास्करराव शेवाळे, वीरवाडी येथे परशुराम वीर, अनिल वीर, पोपट घराळ, रामचंद्र घराळ,तानाजी वीर, बबन हिनुकले, हणमंत पाटील, सुभाष पाटील पै. आण्णा पाटील, म्हासोली येथे व्हा.चेअरमन उदय पाटील, दिनकर पाटील, संतोष सुर्यवंशी, आशोक धनवडे,दत्तात्रय शेवाळे, संजय शेटे,धनाजी मोहिते,भानुदास शेटे, सुखदेव बापू, आण्णासो शेवाळे, पांडुरंग माने, आण्णा पाटील,गंगाराम चोरगे, बजरंग पाटील, राजाराम पाटील, अनिल सुर्यवंशी, पोपट पवार, महादेव पवार, वैभव चोरगे आदी उपस्थित होते.