Download App

भाजपचे कर्नाटकवर लक्ष केंद्रीत; महाराष्ट्रातील ऑपरेशन लोट्सला ब्रेक ?

  • Written By: Last Updated:

Maharashtra BJP Operation Lotus : कर्नाटक विधानसभा निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता असल्याचे राजकीय चर्चा आहे. त्यात कर्नाटकमध्ये भाजपने अनेकांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अनेक जण नाराज आहेत. त्यात काहींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता कर्नाटकवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटस थांबविण्यात आले आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजप महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करेल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

‘माझ्या जावयाला अडकवण्याचा सरकारचा प्लॅन, ज्यांच्याशी जमलं नाही त्यांनीच’.. खडसेंचा घणाघात>

भाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्स दोन राबविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्याभर ही चर्चा होती. राष्ट्रवादी व काँग्रेसमधील काही आमदार भाजपमध्ये जातील, असे सांगणात येत होते. त्यात २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला कमी जागा मिळतील, असा अहवाल विनोद तावडे यांच्या समितीने दिला होता. या अहवालात महाराष्ट्रात भाजपचे खासदार संख्याही ४२ वरून २४ पर्यंत कमी होईल, असे सांगण्यात आले होते. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तावडे यांना भेटले होते. पण काही दिवसांनी तावडे यांनीच असा कोणताही अहवाल दिला नसल्याचे स्पष्ट केले होते.

‘हे विसरू नका उद्धव ठाकरे तुमचे हेडमास्तर होते; भुजबळांचा गुलाबरावांना टोला

तरीही महाराष्ट्रात भाजप ऑपरेशन लोट्स दोन राबविणार असल्याची चर्चा आहे. आता मात्र याला काहीसा ब्रेक लागला आहे. त्याचे कारण आहे कर्नाटक विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे अडकले आहे. या राज्यावर दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. तिकीट वाटपावरून भाजपचे काही माजी आमदार, नेते हे काँग्रेसमध्ये गेले आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये जागा कमी झाल्यास त्याचा फटका इतर राज्यात बसू शकतो. त्यामुळे आता भाजपने कर्नाटकावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्रातील लोट्स ऑपरेशनला ब्रेक लागला असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us