Karnataka Exit Polls 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान झाले. त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. अनेक संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटक विधानसभा त्रिशंकू होईल, असा अंदाज आहे. परंतु इंडिया टुडे व एक्सिस इंडियाच्या अंदाजानुसार काँग्रेसला सर्वाधिक १२२ ते १४० जागा मिळून बहुमत मिळणार आहे. तर सत्ता असलेल्या भाजपला ६२ ते ८० जागा मिळतील, तर जेडीएसला २० ते २५ जागा मिळू शकतात. इंडिया टुडेचा काही अंदाज भाजपची झोप उडविणारा आहे. मुस्लिम आरक्षण, बजरंग दलाचा मुद्दा भाजपवर उलटला असल्याचे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
…तर राज्यात मोठ्या घडामोडी अन् राजकीय पडझड, असीम सरोदेंचं विधान
भाजपने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण काढून इतर समाजाला दिले. त्यामुळे मुस्लिमांमध्ये नाराजी होती. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला आहे. काँग्रेसला ८८ टक्के मुस्लिम मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत ते ७८ टक्के होते. यातून मुस्लिम व्होट बँक काँग्रेसच्या पाठीमागे आली आहे. भाजपला अवघे दोन टक्के मते मिळाली आहेत. गेल्या वेळेस सहा टक्के मते होती.
बजरंग दलावर बंदी घालू असे काँग्रेसने म्हटले होते. त्यावर भाजपने बजरंग बली की जय हा मुद्दा प्रचारात आणला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनीही यावर जोर दिला होता. परंतु त्याचा फायदा भाजपला झालेला नाही. उलट त्याचा फटका भाजपला बसताना दिसत आहे.
कर्नाटक विधानसभा त्रिशंकू?, कुमारस्वामी असणार किंगमेकर
लिंगायत समाजाचे मते भाजपला जास्त मिळतात. परंतु या निवडणुकीत भाजपला ६४ टक्के लिंगायत समाजाचे मते मिळाली आहेत. गेल्या वेळी इतकेच मते भाजपला मिळाली आहेत. काँग्रेसला वीस टक्के मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची चार टक्के मते वाढली आहेत.
दलित मते ही काँग्रेसची पारपंरिक मते आहेत. यावेळी काँग्रेसची मते वाढली आहेत. या वेळी ६० टक्के दलित मते काँग्रेसला मिळताना दिसत आहेत. गेल्या वेळी ४६ टक्के मते होती. म्हणजे तब्बल १४ मते काँग्रेसची वाढली आहे. भाजपला केवळ २२ टक्के मते मिळणार आहे. त्यांच्या मतांमध्ये पाच टक्के घट झाली आहे. मुस्लिम, लिंगायतनंतर ख्रिश्चन व्होट बँकही काँग्रेसच्या पाठीशी आहेत. काँग्रेसला ६८ टक्के मते ख्रिश्चन समाजाची मिळताना दिसत आहेत.
तरुण मतदार काँग्रेसबरोबर
यंदा तरुण मतदार हे काँग्रेसबरोबर गेले आहेत. १८ ते २५ वयोगटातील ४४ टक्के मते काँग्रेसला मिळाली आहेत. भाजपला ३५ मते मिळाली आहेत. तर २६ ते ३५ वयोगटातील ४४ टक्के मते काँग्रेसला मिळाले आहेत. ही व्होट बँक भाजपची होती. ती काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. तर ५० वर्षावरील मतदारांनी भाजपला साथ दिली आहेत. ५१-६० वर्ष वयोगटातील भाजपला सर्वाधिक मते मिळाली आहेत.
कामगार, शेतकरी काँग्रेसच्या बाजूने
कामगार,शेतकरी वर्गाने काँग्रेसच्या बाजूने मतदान केले आहे. ५० टक्के कामगारांनी काँग्रेसला मतदान केले आहेत. तर भाजपला २७ टक्के मते मिळाली आहेत. शेतकरी वर्गातील ३६ टक्के मते काँग्रेसला मिळाली आहेत. भाजपला ३४ टक्के मते मिळाली आहेत. बेरोजगार युवक, गृहिणींचे मते काँग्रेसच्या बाजूने गेले आहेत. काँग्रेसने बेरोजगार तरुण, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यात थेट पैसे खात्यात देण्यात येणार आहे, याचाही फायदा काँग्रेसला मिळाला आहे. याचा अर्थ मुस्लिम, दलित, शेतकरी वर्ग हा काँग्रेसची व्होट बँक होता. हा वर्ग पुन्हा एकदा काँग्रेसकडे येत असताना दिसत आहे.