Download App

दुबईत जाऊन लग्न कर, धनंजय मुंडेंनी दिली 50 कोटींची ऑफर; करूणा मुंडेंचा खळबळजनक दावा

Karuna Munde Allegations On Dhananjay Munde : करूणा मुंडे यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दुबईत जाऊन लग्न करण्यासाठी 50 करोडची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा करूणा मुंडे यांनी केलाय. त्यांनी म्हटलंय की, माझ्या नवऱ्याच्या राजकीय कारकिर्दीचं वाटोळं या गुंडागॅंगनी केलंय. या लोकांनी मी सोडणार नाही. यांच्याशी माझं काहीच देणंघेणं नाहीये. राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर यांना मी सोडणार नाही. यांनी नाचणाऱ्यांना घरात बसवलं अन् पत्नीला (Karuna Munde) रस्त्यावर आणलं. आज माझ्यासंदर्भात चुकीचं पसरवत आहे. माझा नवरा तीन वर्षापासून माझ्योसोबत नाही. आज मी कायद्याने इतर कोणाशी लग्न करण्यास मला परवानगी आहे. त्यामुळं मला जेव्हा काही करायचं असेल तेव्हा मी पूर्ण महाराष्ट्राला सांगेल. मला दुसरं लग्न किंवा अफेअर करायचं असेल तर सांगून करेन.

माझ्या नवऱ्याचं राजकीय करिअरचं वाटोळं याच दलालांनी केलंय. माझ्या नवऱ्याकडून हजारो करोंडोंच्या प्रॉपर्टीवर सही करण्यासाठी हे लोक करत आहे. हजारो तक्रारी दिल्या आहेत. पण सिस्टिमने बांगड्या घातल्या (Beed Politics) आहे. मला हेच सगळं करायचं असतं, तर मला पन्नास करोडची ऑफर होती. दुबईत जावून आरामशीर केलं असतं. माझ्याकडे वकिलाची रेकॉर्डिंग आहे. वकिल आणि धनंजय मुंडे यांचे ते रेकॉर्डिंग लवकरच मी फेसबुकवर टाकणार आहे. तु खूप सुंदर दिसतेस, दुबईत जावून लग्न कर म्हणून. लवकरच मी एकटी परळीत राहायला जाणार आहे.

‘मार्च’मध्ये वाहन विक्रीचा टॉप गिअर! विक्रीत 12 टक्के वाढ; कोणत्या वाहनांची सर्वाधिक विक्री..

तेव्हा धनंजय मुंडेंच्या गुंडांनी यावं अन् माझ्यावर बलात्कार करावे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाका. यानेच तुमचं घर चालतं ना, असं देखील करून मुंडे यांनी यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंनी मला कोर्टात हरवून दाखवावं. मंत्रिपद गेलंय पण माज नाही गेला. परंतु लवकरच हा माज सुद्धा जाणार आहे. सहा महिन्यात आमदारकी रद्द करून दाखवणार, असं चॅलेंज करूणा मुंडे यांनी दिलंय. तेव्हा ही गुर्मी पण जाईल. मी खरी आहे, त्यामुळे ही केस पण मी जिंकणार.

सविता वानखेडे माझ्याबद्दल चुकीचं बोलत आहे. तिच्या नवऱ्याने माझ्याकडे पैश्याची मागणी केलीय, तिच्यासोबत पण मी न्यायानेच लढणार, असं देखील करूणा मुंडे यांनी म्हटलंय. मी भाड खावून मोठी नाही झाले. वाल्मिक कराडने मला एक चापट मारली होती, त्याची आज कशी हालत झालीय. देव आहे. ज्याचं कोणीचं नसतं, त्याचं देव असतो. मी एकटीच लढत आहे. परंतु माझी शक्ती, माझा परमात्मा माझ्यासोबत आहे, असं करूणा मुंडे यांनी म्हटलंय.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

माझ्या गाडीत बंदूक कोणी ठेवली होती, हे सत्य जसं समोर आलं. तसंच आता या व्हिडिओचं देखील सत्य समोर येईल. माझ्या कुंडलीत लिहिलंय की, मी एक संघर्ष करणारी स्त्री आहे. ज्यावेळी पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे यांचा वाद होता. तेव्हा माझ्याच घरात पंकजाविरोधात प्लॅनिंग होतं होतं. तर गोपीनाथ मुंडे यांचा देखील असाच एक घाण व्हिडिओ व्हायरल केला होता. यांनी मेलेल्या व्यक्तीला देखील सोडलं नाही. या सगळ्यामुळे मी आत्महत्या करील असं वाटत असेल, तर मी करणार नाही. मी दलाली खाण्याचं काम करत नाही. हे लोक अतिशय नीच मानसिकतेचे आहेत. माझ्या पाठीमागे कोणीच नाही, उद्या जर मला काही झाले तर यांना सोडू नका असं करूणा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलंय.

 

follow us