Ketaki Chitale Stament On Marathi Language : नेहमीच आपल्या थेट आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली. यावेळी तिच्या विधानाने थेट मराठी भाषेच्या अभिजात (Marathi Language) दर्जा मिळवण्याच्या मागणीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओत केतकीने म्हटलंय की, मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? ही तर फक्त ‘इन्सिक्युरिटी’ आहे.
केतकीचा संतापजनक सवाल
केतकी चितळे म्हणाली की, मराठी बोलायला कुणी सांगितलं की लोक चिडतात, पण खरंच विचार केलात, तर कुणी मराठीत न बोलल्यानं मराठी भाषेला काही इजा होते का? मराठी बोल म्हणणाऱ्यांना मी विचारते, कुणी बोललं नाही तर भोकं पडतात का भाषेत? काहीच होत नाही. ही तुमची स्वतःची असुरक्षितता आहे.
Lightning Strikes : मोठी बातमी, पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून 13 जणांचा मृत्यू
अभिजात दर्जाबाबत तीव्र आक्षेप
2024 मध्ये भारत सरकारने मराठीसह बंगाली व आसामी भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी नवा निकष जारी केला. यावर केतकी चितळे म्हणाली, हा क्रायटेरिया चुकीचा आहे. जर दर्जा द्यायचाच असेल, तर मग सगळ्याच भाषांना द्या. ‘अभिजात’ हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ स्वतंत्र असणे. जी भाषा इतर भाषांवर आधारित नाही, तीच अभिजात ठरते. मग मराठीच नव्हे तर अनेक भाषांवर या निकषांमुळे प्रश्नचिन्ह उभं राहतं, असं देखील केतकीने म्हटलं आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ( Balasaheb Thackeray) नातवंडं एका कॅथलिक मिशनरी शाळेत शिकतात. त्या ठिकाणी प्रार्थनासभेमध्ये आरती, पसायदान म्हटलं जात नाही. तिथे बिबलीकल हिम्स म्हटल्या जातात. तिथे त्यांना का शिकवलं जातंय? मात्र, दुसऱ्यांना अक्कल सांगत फिरणार की, मराठीमध्ये बोलणं किती गरजेचं आहे, अनिवार्य आहे, असा टोला केतकीने लगावला आहे.
मराठीचा अभिमान, पण भाषेवरून मारहाण करणं खपवून घेणार नाही; CM फडणवीसांनी ठणकावलं
संपूर्ण महाराष्ट्र एकवटला
केतकीने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, एकाने मला सांगितलं की, हिंदी-उर्दूला आजवर अभिजात दर्जा मिळालेला नाही. मग त्यांनीही भांडावं का? दर्जा मिळाल्यानं काय फरक पडतो? उलट ही मागणी म्हणजे असुरक्षिततेचं लक्षण आहे. केतकीच्या या विधानांमुळे राज्यात भाषाभिमान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकजण म्हणत आहेत की, मराठी भाषा टिकवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकवटला असताना, केतकीसारख्या मराठी कलाकारांकडूनच असा तिरस्कार करणं हे दुर्दैवी आहे.
विशेषतः जेव्हा मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी साहित्यिक, भाषातज्ज्ञ, आणि राज्य सरकारकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत, तेव्हा अशा विधानामुळे प्रयत्नांनाच झटका बसतो, अशी भावना व्यक्त होत आहे.