Download App

मराठीचा अभिमान, पण भाषेवरून मारहाण करणं खपवून घेणार नाही; CM फडणवीसांनी ठणकावलं

मराठी भाषेचा अभिमान आहे, ती अभिजात आहे, मात्र, भाषेवरून कुणाला मारहाण करणं योग्य नाही, ते खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राहून आम्ही मराठी (Maratahi) बोलणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या इतर भाषिकांविरोधात मनसेने (MNS) चांगलीच आक्रमक झाली होती. काहीच दिवसांपूर्वी मनसेनं एका गुजरातीला व्यावसायिकाला चोप दिला होता. दरम्यान, मराठी भाषेचा अभिमान आहे, ती अभिजात आहे, मात्र, भाषेवरून कुणाला मारहाण करणं योग्य नाही, ते खपवून घेणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठणकावलं. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

Shirdi : साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिस प्रशासन सतर्क… 

दिल्लीतील जेएनयूमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि मराठी भाषा अभ्यासनाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, मराठी ही देशातील अतिप्राचीन भाषांपैकी एक आहे, याचे बरेच पुरावे सापडले आहेत. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली मागणी स्वीकारली असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी ही आधीच अभिजात होती, पण त्या भाषेला आता राजाश्रय मिळाला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे फडणवीस म्हणाले.

झारखंडच्या दारू घोटाळ्यात अमित साळुंखे गजाआड, महाराष्ट्रातील रुग्णवाहिका घोटाळ्याशीही संबंध 

पुढं ते म्हणाले, मराठी भाषेने देशाला समृद्ध केले आहे, आपली नाट्यसृष्टी ही सर्वोत्तम आहे. जर कोणत्या भाषेने देशात रंगभूमी टिकवली आणि समृद्ध केली असेल तर ती मराठी भाषा आहे. त्यामुळेच मराठी भाषेवर संशोधन व्हावं यासाठी हे अध्ययन केंद्र इथं झालंय, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असल्याच पाहिजे, त्यासोबतच इतर भारतीय भाषांचा अभिमान असला पाहिजे. आम्ही इंग्रजीचा पुरस्कार करतो, इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो, याचं कुठंतही दुःख होतं. आपला वाद मराठी आणि हिंदी नाही. पण, मराठीसोबत इतर भारतीय भाषाही स्वीकारल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह होणं स्वाभाविक आहे. ते चुकीचं नाही. मात्र, भाषेवरून वाद होणं,कुणाला मारहाण करणं कदापि सहन केलं जाणार नाही. आम्ही यापूर्वीही कारवाई केली असून यापुढेही कोणी तसा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

follow us