भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मागील अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना धरत होते. सोमय्यांच्या आरोपांनंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना तुरुंगातही रहावं लागलं आहे. सोमय्या सारखं कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. एका वृत्तवाहिनीने सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह अवस्थेतला व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुराचं रंगल्याचं दिसून आलं.
मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळा,
आज जंबो कोविड सेंटर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सी ना देण्या संबंधी चा फाईल चे RTI अंतर्गत इन्स्पेक्शन केले, MMRCL मुंबई मेट्रो चा अधिकाऱ्यांशी चर्चा केली @BJP4Maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
दरम्यान, व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर विरोधकांनी सोमय्या यांच्यावर गंभीर आरोपांसह टीका करण्यात आली होती. त्यावर सोमय्यांनी आपली प्रतिक्रियाही दिली आहे. माझ्याकडून कुठल्याही महिलेवार अत्याचार झाला नसून मी देवेंद्र फडणवीसांना व्हिडिओची सत्यता तपासण्याबाबत चौकशी करण्याची विनंती केली असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
NDA बैठकीत CM शिंदे अन् अजितदादांची छाप; स्वागत करण्याचा अन् पहिल्या रांगेत उभं राहण्याचा मान
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या सदृश्य व्यक्ती पूर्णपणे नग्न होऊन अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पुढे आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार टीका केली.
अजित पवारांना साथ देणाऱ्या संग्राम जगतापांना झटका ! दोघे निकटवर्तीय पक्षातून बडतर्फ
कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्यांनी नवीन ट्विट केलं आहे. त्यांच नवीन ट्विट मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळ्याबाबत आहे. “आज जंबो कोविड सेंटर बांधण्याचं कंत्राट ‘ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सी’ला देण्यासंबंधीत फाईलची RTI अंतर्गत तपासणी केली. तसेच MMRCL मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.” असं सोमय्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.