अजित पवारांना साथ देणाऱ्या संग्राम जगतापांना झटका ! दोघे निकटवर्तीय पक्षातून बडतर्फ

अजित पवारांना साथ देणाऱ्या संग्राम जगतापांना झटका ! दोघे निकटवर्तीय पक्षातून बडतर्फ

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करत अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांचा गटसोबत घेऊन थेट राजभवन गाठले आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकार मध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या शपथविधीला नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आपल्या कार्यकर्ते व पदधिकऱ्यांसमवेत हजेरी लावली होती. दरम्यान अजित पवारांना साथ दिल्याने राष्ट्रवादीचे नगरमधील माणिकराव विधाते (Manikrao Vidhate) व अभिजित खोसे (Abhijit Khose) यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. (Manikrao Vidhate and Abhijit Khose expelled from NCP for supporting Ajit Pawar)

राज्याच्या सध्याच्या अस्तित्वात असलेल्या म्हणजेच विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या (अजित दादा गट) आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै रोजी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून व संघटनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.

अभिनेत्री दिशा परमार लवकरच आई होणार… 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची साथ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांचे समर्थक असलेले पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस रविंद्र पवार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.

अजित पवारांच्या बंड ही राज्याच्या राजकारणात मोठी खळबळजनक घटना घडली होती. शिवसेनेच्या बंडानंतर राज्यात पुन्हा एकदा बंडाची ठिणगी पडली. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवारांनी थेट पक्षावर आणि चिन्हावरच दावा ठोकला. त्यामुळं अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाला होता. यामध्ये अनेकांनी अजित दादांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातून सहा पैकी चार आमदारांनी अजित पवार गटाला साथ दिली. यामुळे अनेक आमदारांच्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या नेत्याच्या बाजूने साथ देणे पसंत केले. मात्र यामुळे नगर शहरातील विधाते व खोसे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर याआधी राष्ट्रवादीतील मोठे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनीची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळं पक्षातून हकालपट्टी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube